शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सिंधुदुर्ग : गुंडशाही नेस्तनाबूत करण्यासाठी एकसंघ होण्याची गरज : श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 3:08 PM

कट्टर हिंदुत्व विचारसरणी अंगीकारून धर्माच्या नावाखाली गुंडशाही करणाऱ्यांना कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व घटकांनी एकसंघ होऊन नवी विचारसरणी आचरणात आणायला हवी, असे प्रतिपादन गडहिंग्लजचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी येथे आयोजित धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी परिषदेत केले.

ठळक मुद्दे सिंधुदुर्ग : गुंडशाही नेस्तनाबूत करण्यासाठी एकसंघ होण्याची गरज : श्रीपतराव शिंदे सावंतवाडी येथील धार्मिक दहशतवाद, असहिष्णुता विरोधी परिषदेत मार्गदर्शन

सावंतवाडी : कट्टर हिंदुत्व विचारसरणी अंगीकारून धर्माच्या नावाखाली गुंडशाही करणाऱ्यांना कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व घटकांनी एकसंघ होऊन नवी विचारसरणी आचरणात आणायला हवी, असे प्रतिपादन गडहिंग्लजचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी येथे आयोजित धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी परिषदेत केले.पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्रात दहशत व अराजकता निर्माण करू पाहणार्‍या शक्तींना कायमचा पायबंद घालण्याची वेळ आली आहे, असा विचार उपस्थितांनी व्यक्त केला. या परिषदेला कॉ. संपत देसाई, सत्यशोधक आंदोलनाचे अंकुश कदम, नगराध्यक्ष बबन साळगावकर, आनंद मेणसे, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, महेश परुळेकर, संजय वेतुरेकर, लीलाधर घाडी आदी उपस्थित होते.शिंदे म्हणाले, राजकीय क्षेत्रात हुकूमशाही आली की कष्टकरी जनतेला अच्छे दिन कसे येतील? आज वाढते पेट्रोल दर व अन्य समस्या भेडसावत आहेत. हत्या होत आहेत. मात्र, अशा विषयांवर देशभ्रमंती करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांना ब्र देखील का काढता येत नाही? हेच का त्यांचे अच्छे दिन? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.संपत देसाई म्हणाले, दहशत माजवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होण्याचे हे दिवस भयानक आहेत. यासाठी सर्वांनी एक होऊन लढा दिला पाहिजे. अन्यथा ही दहशत वाढतच जाईल. नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, सावंतवाडी सुसंस्कृत शहर आहे. येथे झालेल्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनासाठी गोविंद पानसरे या नगरीत आले होते. त्यावेळच्या व अन्य चळवळीत सहभाग असलेल्या लेखकाच्या पाठीशी सर्वांनी रहायला हवे. कारण एकजूट असेल तरच असे प्रकार रोखता येतील.

अंकुश कदम यांनी धर्माच्या नावाखाली जे काही चालले आहे, ते घातक असून आज लेखक, कवी यांच्यावर हल्ले होत आहेत. हे आपल्या देशाला भूषणावह नाही. राज्यकर्त्यांनी त्यांना संरक्षण द्यायला हवे, असे मत व्यक्त केले.यावेळी संजय वेतुरेकर, प्रा. सुमेधा नाईक, डॉ. गोविंद काजरेकर, वीरधवल परब, राजेश मोंडकर, लीलाधार घाडी यांनी मनोगत मांडले. यावेळी रमेश बोंदे्र, बाळ बोर्डेकर, डॉ. जी. ए. बुवा, शशी नेवगी, नितीन वाळके, नंदू पाटील, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, प्रभाकर भागवत, प्रा. विजय फातर्पेकर, विठ्ठल कदम, अमोल कदम, राजेंद्र्र कांबळे, प्रकाश तेंडोलकर, आनंद परुळेकर, मधुकर मातोंडकर, प्रज्ञाकुमार गाथाडे, जयंत बरेगार, सिद्धार्थ तांबे, विजय ठाकर, महेश पेडणेकर, रवींद्र्र संकपाळ, रामदास जाधव, अनिल सरमळकर, प्रा. रुपेश पाटील, शिवाजी वांद्र्रे, योगेश संकपाळ, उषा परब, अ‍ॅड. प्रकाश परब, डॉ. शरयू आसोलकर, अनिता सडवेलकर, महाश्वेता कुबल, समीर बेग उपस्थित होते.

यावेळी मारेकर्‍याच्या हिटलिस्टवर असणार्‍या साहित्यिकाच्या मनोगताचे वाचन नंदू पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश परुळेकर, प्रास्ताविक अ‍ॅड. संदीप निंबाळकर यांनी केले. हा धार्मिक दहशतवाद राज्यकर्त्यांच्या हुकूमशाहीमुळे चालला आहे. हा दहशतवाद निर्माण करू पाहत आहे. अशा प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनी लढा द्यायला हवा, असा निर्णय घेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भेट देत निवेदन दिले.हिटलिस्टवर असलेल्या लेखकाचे मनोगतहिटलिस्टवर असलेल्या लेखक प्राध्यापकाने आपले मनोगत परिषदेत पाठविले होते. त्याचे वाचन नंदू पाटील यांनी केले. लेखकाने म्हटले आहे की, लेखकाला हवे ते लिहिता येऊ नये असा हा काळ आहे. या काळात आपल्यातल्या एखाद्या लेखकाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होतो. सर्व जण सैरभैर होतात, मुळात विखुरलेले असलेले सबबी सांगत आणखी दूर जातात. ही गोष्ट आपल्या मध्यमवर्गीय मानसिकतेला साजेशीच आहे. पण या अशा वेळीच आपली वैचारिकता, भूमिकेतील ठामपणा, मानसिक कणखरपणा यांची कसोटी लागत असते.

मराठी लेखक अन्य भाषिक लेखकांच्या तुलनेत या बाबतीत कमी पडतो, हे आणीबाणीसह अनेक प्रसंगांतून दिसून आले आहे. एखादा दुर्गा भागवतांसारखा अपवाद वगळता बहुसंख्य लेखकांनी आपल्या सुरक्षित कवचात राहणे पसंत केले आहे. पु. ल. देशपांडे, दळवी, आ. ना. पेडणेकर, तुलशी परब, नेमाडे, जयंत पवार अशांनी भाषण वा प्रासंगिक लेखन यामधून सडेतोड भूमिका घेतली आहे. आज या गोष्टींचीच गरज आहे. 

टॅग्स :literatureसाहित्यRatnagiriरत्नागिरी