सिंधुदुर्ग : ...अन्यथा पक्षांतर्गत कारवाई : विकास सावंत, काँग्रेस चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 05:41 PM2018-01-25T17:41:20+5:302018-01-25T17:45:46+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी पक्षाच्या बैठकांना उपस्थित रहावे, अन्यथा पक्षांतर्गत कारवाईला सामोरे जावे, अशा इशारा जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी बुधवारी येथे आयोजित बैठकीत दिला. आमदार नीतेश राणेही अशा कारवाईतून सुटणार नसून त्यांच्यावर राज्यस्तरावरून कारवाई होणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

Sindhudurg: ... otherwise the action taken under the party: Vikas Sawant, a signal to the people's representatives on Congress symbol | सिंधुदुर्ग : ...अन्यथा पक्षांतर्गत कारवाई : विकास सावंत, काँग्रेस चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना इशारा

सिंधुदुर्ग : ...अन्यथा पक्षांतर्गत कारवाई : विकास सावंत, काँग्रेस चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना इशारा

Next
ठळक मुद्दे...अन्यथा पक्षांतर्गत कारवाई : विकास सावंतकाँग्रेस चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना इशारानीतेश राणेंना नोटीस येणार; इच्छुकांनी अर्ज सादर करा

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी पक्षाच्या बैठकांना उपस्थित रहावे, अन्यथा पक्षांतर्गत कारवाईला सामोरे जावे, अशा इशारा जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी येथे आयोजित बैठकीत दिला. आमदार नीतेश राणेही अशा कारवाईतून सुटणार नसून त्यांच्यावर राज्यस्तरावरून कारवाई होणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची पत्रकार परिषद येथील आरपीडी हायस्कूलमध्ये पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी सावंतवाडी तालुक्यातील विस्तारात काँग्रेस कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर, जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, शहराध्यक्ष बाबल्या दुभाषी, चंद्रकांत गावडे आदी उपस्थित होते.

सावंत म्हणाले, जिल्हा परिषदेवर आजही काँग्रेसची सत्ता आहे. काही पंचायत समितीही काँग्रेसच्या ताब्यात आहेत. मात्र आज काही लोकप्रतिनिधी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून दुसऱ्या पक्षाच्या बॅनरखाली वावरत आहेत. हे चुकीचे असून काँग्रेस पक्ष ज्या ज्या वेळेला अशा लोकप्रतिनिधींना पक्षाच्या बैठकांना बोलावेल, त्यावेळी त्यांनी बैठकांना उपस्थित राहणे आवश्यक आहे. सावंतवाडी तालुक्यात उघडकीस आलेले ड्रग्ज पार्टी प्रकरण हे युवा पिढीसाठी धोकादायक आहे.

प्रशासनाने विशेषत: पोलीस प्रशासनाने याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. आज ज्या पक्षाचे गृहराज्यमंत्री आहेत त्याच सत्ताधारी शिवसेना पक्षाचे लोक आंदोलनाची भाषा करतात हे हास्यास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणात काँग्रेस पक्षाकडून वरिष्ठ पातळीवर निवेदन देण्यात येणार असून यामध्ये कोणतीही व्यक्ती असल्यास त्याला पाठिशी घालण्यात येऊ नये, अशी आमची भूमिका राहणार असल्याचे विकास सावंत म्हणाले.

देशात धर्मनिरपेक्षता धोक्यात आली असून विरोधी पक्ष म्हणून येत्या २६ जानेवारी रोजी कुडाळ येथे सायंकाळी ४ वाजता ह्यसंविधान बचावह्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील पदाधिकारी मंडळीच उपस्थित राहणार आहेत. ओरोस जैतापकर कॉलनी येथे काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. शिवाय फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसाठी शिबिर होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

नीतेश राणेंना नोटीस येणार; इच्छुकांनी अर्ज सादर करा

ज्या कोणाकडून हा आदेश मोडला जाईल त्याला पक्षाच्या तरतुदीनुसार कायद्याने नोटीस बजाविण्यात येणार आहे. आमदार नीतेश राणे यांच्याबाबतही हा नियम लागू असणार आहे. मात्र ते आमदार असल्याने त्यांना राज्यस्तरावरून याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबत बोलणी सुरू आहे. मात्र काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीसाठी जे जे इच्छुक आहेत, त्यांनी अर्ज संपूर्ण माहितीसह तालुका काँग्रेसकडे सादर करावेत, असे आवाहन सावंत यांनी केले.
 

Web Title: Sindhudurg: ... otherwise the action taken under the party: Vikas Sawant, a signal to the people's representatives on Congress symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.