शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

 सिंधुदुर्ग : पोलिसांशी बाचाबाची; कुडाळात काही काळ तणावाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 3:24 PM

दिलीप बिल्डकॉनच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करा, या मागणीसाठी कुडाळ तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यासमोर सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन छेडले.

ठळक मुद्देपोलिसांशी बाचाबाची; कुडाळात काही काळ तणावाचे वातावरणदिलीप बिल्डकॉनवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या, आंदोलनकर्ते आक्रमक

कुडाळ : झाराप येथील महामार्गाचे चौपदरीकरण करताना वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीच दक्षता न घेतल्याने या ठिकाणी अपघातात पाच बळी गेले असून झाराप-जांभरमळा येथील दुचाकी व टँकर यांच्यात झालेला अपघात व ज्ञानेश्वर ताम्हाणेकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दिलीप बिल्डकॉनच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करा, या मागणीसाठी कुडाळ तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यासमोर सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन छेडले.

या आंदोलनानंतर पोलिसांनी दिलीप बिल्डकॉनच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केल्यावरच हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्ते व पोलीस निरीक्षक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याने कुडाळ पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाराप जांभरमळा बसस्टॉप येथील महामार्गावर घडलेल्या टँकर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी चालक ज्ञानेश्वर रामचंद्र ताम्हाणेकर (४२, रा. नमसवाडी माणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला होता.यावेळी या ठिकाणी जमलेल्या नागरिक व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी या अपघाताला महामार्गाचे काम करणारी दिलीप बिल्डकॉनची कंपनीच जबाबदार आहे. कारण त्यांनी वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीच उपाययोजना येथे केलेली नाही. त्यामुळे येथे वारंवार अपघात होतात. याच झाराप परिसरातील हा पाचवा बळी असून या अपघातप्रकरणी दिलीप बिल्डकॉनच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी बुधवारी कुडाळ तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी केली होती.या ठिय्या आंदोलनात भाजपचे जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, नागेंद्र परब, राजू कविटकर, नगराध्यक्ष विनायक राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित सामंत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक नारकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजन नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, बंड्या कुडतरकर, उपनगराध्यक्ष आबा धडाम, नगरसेवक ओंकार तेली, सुनील बांदेकर, बाळा वेंगुर्लेकर, सचिन काळप, गणेश भोगटे, राकेश कांदे, संतोष शिरसाट, राजू तेंडोलकर, सरपंच स्वाती तेंडोलकर, संदीप राऊळ, सरपंच अनुप नाईक, सतीश कुडाळकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.आंदोलनकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडल्यामुळे पोलीस अधिकाºयांनी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यास सांगितले. मात्र आपल्या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम राहिल्याने शेवटी कुडाळ पोलिसांनी दिलीप बिल्डकॉनचे संपर्क अधिकारी रवी कुमार यांना कुडाळ पोलीस ठाण्यात तत्काळ बोलावून त्यांच्याशी आंदोलनकर्त्यांना चर्चा करण्यास सांगितले.

आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची नाही तर तुम्ही त्यांना अटक करा मगच आम्ही आंदोलन मागे घेतो, अशी ठाम भूमिका घेतली. या नंतर काही वेळाने पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस यांनी या अपघातप्रकरणी संबंधित ठेकेदाराची योग्य ती चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्गAccidentअपघात