शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

सिंधुदुर्गनगरी पोलीस दलाची विघ्नहर्ता १०० योजना

By admin | Published: August 28, 2014 9:24 PM

पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांच्या संकल्पनेतून सुरू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत गरजू व्यक्तींना तत्काळ रक्त पुरवठा व्हावा या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे ‘विघ्नहर्ता १०० योजना’ पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांच्या संकल्पनेतून सुरू झाली आहे.जिल्ह्यामध्ये रस्ते अपघात आणि इतर आजारपणाने त्रस्त असलेल्या व्यक्तींना अनेकवेळा रक्ताची गरज भासते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रूग्णास जीव गमावण्याची वेळ येऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी अशा रूग्णाचे प्राण वाचावेत आणि जनता- पोलीस यांच्यामधील सौदार्हाचे नाते अधिक दृढ व्हावे, या सामाजिक बांधिलकीतून ‘विघ्नहर्ता १०० योजना’ गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असे सुमारे १३०० संख्येचे मनुष्यबळ आहे. या योजनेंतर्गत स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रक्तगटाची माहिती नियंत्रण कक्ष तसेच पोलीस ठाणे येथे संकलित करून उपलब्ध करून ठेवण्यात येणार आहे. ज्या रूग्णांना रक्ताची आवश्यकता आहे त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय, ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये त्यांची गरज सांगितल्यावर संबंधित रक्तगटाच्या स्वेच्छेने रक्तदान करणारे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठविले जाईल आणि त्यांच्याकडून रक्तदान केले जाईल, असे या योजनेचे स्वरूप आहे. गुरूवारी सायंकाळी ५ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांच्या उपस्थितीत योजनेचा उद्घाटन सोहळा झाला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक आर. डी. माने, अप्पर पोलीस अधीक्षक विनिता साहू, पोलीस उपअधीक्षक आरोसकर, इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी खरात, चौरे व इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)