सिंधुदुर्ग : राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी महसूल जवळ असलेल्या ग्रामीण भागातील घर परवानगी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा ग्रामविकास विभागाकडे दिल्या.त्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत असताना शासनाने धूळफेक केल्याचे पुढे येत आहे.
ग्रामविकास विभागाने हि अधिसूचना काढण्याची गरज असताना नगरविकास विभागाने हि अधिसूचना काढली आहे.या अधिसूचनेवर हरकती घ्यायच्या नाहीत.केवळ अवलोकनार्थ २८ डिसेंबर पर्यंत हि अधिसूचना आहे.
ग्राम विकास विभागाकडे पुन्हा परवानगी दिली असली तरी महसूल जवळ परवानगी घेताना असलेल्या क्लिष्ट अटी मात्र येथेही पूर्ण कराव्या लागणार आहेत.हि बाब शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या वित्त समिती सभेत समोर आली आहे.
जिल्हा परिषदेच्या नाथ पै सभागृहात प्रभारी सभापती रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेला अधिकारी विशाल पवार, सदस्य रविंद्र जठार, महेंद्र चव्हाण, संजय देसाई,गणेश राणे, अनघा राणे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधिनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपली पाठ थोपटून घेतली.मात्र, प्रत्येक्षात शासनाने आपली धूळफेक केली आहे, असा आरोप यावेळी सदस्य रवींद्र जठार, महेंद्र चव्हाण यांनी केला.