शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सिंधुदुर्ग : अतिंद्र सरवड़ीकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 3:55 PM

मुंबई येथील सुप्रसिद्ध गायक डॉ. अतिन्द्र सरवडीकर यांच्या सुमधुर सुरांनी संगीत रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते ते गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व शास्त्रीय संगीत मासिक सभेचे.

ठळक मुद्देअतिंद्र सरवड़ीकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध आशिये येथे गंधर्व शास्त्रीय संगीत सभा

कणकवली : मुंबई येथील सुप्रसिद्ध गायक डॉ. अतिन्द्र सरवडीकर यांच्या सुमधुर सुरांनी संगीत रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते ते गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व शास्त्रीय संगीत मासिक सभेचे.गंधर्व शास्त्रीय संगीत सभेचे 19 वे पुष्प डॉ अतिंद्र सरवडीकर यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून रविवारी गुंफले.अविनाश पटवर्धन यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित केलेल्या या गंधर्व संगीत सभेचा आस्वाद घेण्याची संधी कणकवलीकरांना या निमित्ताने लाभली.डॉ अतिंद्र सरवडीकर हे अभिजात शास्त्रीय संगीतातले आजच्या युवा पिढीतले देशपातळीवरचे शीर्षस्थ नाव आहे. प्रतिभावान गायक असण्याबरोबरच रचनाकार, गीतकार, लेखक, संगीत संशोधक, गुरू असेही अनेक पैलू त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्वाला आहेत.आशिये येथील कार्यक्रमाच्या वेळी प्रास्ताविक गंधर्व फाउंडेशनचे अध्यक्ष अभय खडपकर यांनी केले . डॉ अतिन्द्र सरवड़ीकर यांनी प्रसंगोचित मियाँ की मल्हार रागामध्ये विलंबित व द्रुत बंदिश आकर्षक रितीने सादर केली. सुरांचा मल्हार सुरु असतानाच निसर्गामध्ये सरींचा मल्हार सुरु झाला आणि वातावरण प्रसन्न झाले. त्यानंतर बिहाग रागामधील त्यांची स्वरचित बंदिश व गुरू स्वरयोगिनी डॉ प्रभा अत्रे रचित एक तराणा त्यांनी सादर केला.

"जमुना किनारे मोरा गाव "या मांज खमाज रागातील दादरा गाऊन डॉ. अतिन्द्र यांनी रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. मिश्र परमेश्वरी रागातील ' रंजल्या गांजल्या अपुला म्हणे जनार्दन' या आर्त स्वरातील अभंगाने वातावरण भक्तिमय बनले.

स्वर, लय, ताल यांवरील असलेल्या प्रभुत्वाबरोबरच नादमय व सुस्पष्ट शब्दोच्चारण, काव्याची व विविध गानप्रकारांच्या वैशिष्ट्यांची उत्तम समज, आवाजाचा उत्तम व वैविध्यपूर्ण वापर तसेच संवेदनशील व भावपूर्ण गायन, स्वत:चा विशिष्ट संगीत विचार यांमुळे डॉ . अतिंद्र सरवडीकर यांचं गाणं ऐकणं हा रसिकांसाठी एक विलक्षण समाधान देणारा सुंदर अनुभव होता.मध्यांतरानंतर कवी प्रसाद कुलकर्णी यांनी डॉ. अतिंद्र सरवडीकर यांची प्रकट मुलाखत घेतली. किराणा घराण्याच्या शैलीतील अनेक बारकावे, त्याचा इतिहास खूप छान पद्धतीने डॉ. अतिंद्र यांनी मांडला. आपल्या जीवनातील अनेक चढउतार , गुरूंची शिकवण, गुरुबद्दलचं प्रेम, रियाज यावर खूप सुंदर रीतीने त्यांनी भाष्य केले.

आज विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमांत शास्त्रीय संगीताला जागा फार कमी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रसाद कुलकर्णी यांच्या विनंतीने "कळीचे फुल होताना कळीने काय मागावे" हे भावगीत त्यांनी सुंदररीत्या सादर केले. ही मुलाखत खूपच रंगली. अनेक श्रोतेही यात उत्फूर्तपणे सहभागी झाले होते." शास्त्रोक्त संगीत ऐकणारे कान निर्माण करणे आणि ते निर्माण करताना चांगली मने निर्माण करणे हे फारच कठीण काम आहे, अर्थातच गंधर्व फाउंडेशनचे हे कठीण काम दखलपात्र आहे" अशा शुभेच्छा कवी प्रसाद कुलकर्णी यांनी यावेळी गंधर्व संगीत सभेला दिल्या. कार्यक्रमाचा शेवट "मुखी नाम तुझे रे गोविंद "या भैरवीने डॉ.अतीन्द्र सरवड़ीकर यांनी केला.या कार्यक्रमात हार्मोनियमवर रत्नागिरी येथिल मधुसूदन लेले यांनी तर तबल्यावर कुडाळ येथिल सिद्धेश कुंटे यांनी अतिशय उत्तम साथसंगत केली. डॉ अतिंद्र सरवडीकर यांचे शिष्य मंदार जडये व मयूर कुलकर्णी यांनी तानपुऱ्यावर तसेच एबी वर्गीस यांनी स्वरमंडलावर साथ केली.19 वी गंधर्व संगीत सभा ही कणकवलीमध्ये शास्त्रीय संगीत रुजविण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्या संगीत साधक व गुरु संध्या पटवर्धन यांनी आपला मुलगा अविनाश पटवर्धन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रायोजित केली होती .

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष सुतार, किशोर सोगम, शाम सावंत, सिने अभिनेते अभय खडपकर, दामोदर खानोलकर, विलास खानोलकर, मनोज मेस्त्री, मनीषा पालव, स्नेहा खानोलकर, लता खानोलकर ,राजू करंबेळकर, बाबु गुरव, संतोष जोशी तसेच आशिये दत्त मंदिर समिती व गंधर्व फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.19 ऑगस्ट रोजी 20 वी गंधर्व सभा !गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आशिये येथे 19 आॅगस्ट रोजी 20 वी गंधर्व संगीत सभा पं. राम देशपांडे यांचे शिष्य आदित्य मोडक यांच्या गायनाने रंगणार आहे. असे यावेळी जाहिर करण्यात आले. 

टॅग्स :musicसंगीतcultureसांस्कृतिकsindhudurgसिंधुदुर्ग