अनंत जाधव
सावंतवाडी : सिंधुदुगसह रत्नागिरीच्या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा रत्नागिरी व चिपी विमानतळ आता सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी दिल्लीत हवाई वाहतूक मंत्रालयाने अधिसुचना काढत उडाण ३.१ च्या अंतर्गत बोली लावल्या. त्यात विविध कंपन्यांनी सिंधुदुर्गातून मुंबई, पुणे व नाशिक तर रत्नागिरी तून मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. रत्नागिरी परवानग्या पूर्ण झाल्या आहेत तर चिपी विमानतळाच्या काहि परवानग्या घेणे बाकी असल्याने त्या पूर्ण झाल्यानंतर या विमानसेवा सुरू होणार आहेत. हवाई वाहातुक मंत्रालयाचा कार्यभार प्रभूनी हाती घेतल्यानंतर ही प्रभूकृपाच कोकणवर झाली आहे.
चिपी विमानतळ पूर्ण होऊन सहा महिने झाले होते. मात्र या विमानतळासाठी लागणाºया काही परवानग्या बाकी होत्या. तरीही १२ सप्टेंबरला मुंबई ते चिपी असे पहिली विमान चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर अधिकृत विमानसेवा १२ डिसेंबरला सुरू होईल, अशी घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. पण १२ डिसेंबरची डेडलाईन प्रशासनाला पाळता आली नव्हती. त्यामुळे टिकाही झाली होती. त्यातच अलिकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी चिपी विमानतळाच्या काही परवानग्या घेणे बाकी आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी अद्याप मिळाली नाही, असे स्पष्ट केले होते.मात्र, ही परवानगी आपण लवकरच घेऊ, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे विमानसेवा सुरू होणार हे स्पष्ट झाले होते. त्यासाठीच उडान ३.१ मध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी विमानतळांचा समावेश करण्यात आला. त्यासाठी विमान वाहतूक मंत्रालयाने अधिसूचनाही काढली होती. त्यानंतर शुक्रवारी ८ सप्टेंबरला दिल्ली येथे विमान वाहतूक मंत्रालयाने विविध कंपन्यांना निमंत्रित केले होते. त्यात काही कंपन्यांनी सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यामुळेच आता चिपी विमानतळावरून मुंबई तसेच पुणे व नाशिक अशी विमानसेवा सुरू होणार आहे. तसेच या तीनही विमानतळांशी चिपी विमानतळ जोडले जाणार आहे.
रत्नागिरी विमानतळांचे काम पूर्ण होउन बरीच वर्षे झाली होती.पण तेथून ही विमानसेवा सुरू नव्हती मात्र प्रभू कृपे मुळे आता रत्नागिरी विमानतळांचा समावेश ही उडाण मध्ये करण्यात आला असून,रत्नागिरी मुंबई अशी विमानसेवा सुरू होणार आहे.त्यामुळे एकप्रकारे कोणकला अच्छे दिनच आले आहेत.तसेच रत्नागिरीचे पर्यटन ही वाढणार आहे. दरम्यान, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी ही विमानसेवा काही तांंत्रिक परवानग्या पूर्ण झाल्यानंतर सुरू होईलच, त्याशिवाय सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पर्यटनालाही चालना मिळणार आहे. यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सेवेचा लवकरच शुभारंभ होणार आहे. मात्र, त्या पलीकडे जाऊन सिंधुदुर्ग पर्यटन दृष्ट्या जगाशी जोडला जाईल याचा आनंद मोठा आहे आणि हे काम लवकरच पूर्ण होणार आहे, असे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दाखवणार हिरवा झेंडाचिपी विमानतळाच्या काही तांत्रिक परवानग्या पूर्ण झाल्यानंतर चिपीतून विमानसेवेला अधिकृतरित्या सुरूवात होणार आहे. याचे उद्घाटनही लवकरच होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवून हे उद्घाटन होईल, असे यावेळी सांगण्यात आले.