शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
2
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
6
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
7
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
8
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
9
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
10
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
11
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
12
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
13
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
14
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
15
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
16
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
17
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
19
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
20
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!

सिंधुदुर्ग : आॅलिव्ह रिडलेची ती पिल्ले सोडली नैसर्गिक अधिवासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 3:04 PM

मोचेमाड समुद्र्रकिनारी संरक्षित केलेल्या दुर्मीळ आॅलिव्ह रिडले कासवाच्या अंड्यांच्या दोन घरट्यांमधून १२२ पिल्लांना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वनविभाग व येथील स्थानिकांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

ठळक मुद्देआॅलिव्ह रिडलेची  पिल्ले सोडली नैसर्गिक अधिवासातएप्रिल, मे महिन्यात कासवांच्या पिल्लांना पाहण्याची संधी

वेंगुर्ले : मोचेमाड समुद्र्रकिनारी संरक्षित केलेल्या दुर्मीळ आॅलिव्ह रिडले कासवाच्या अंड्यांच्या दोन घरट्यांमधून १२२ पिल्लांना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वनविभाग व येथील स्थानिकांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.मोचेमाड समुद्रकिनारी १४ फेब्रुवारीच्या दरम्यान आॅलिव्ह रिडले प्रजातीची अंडी येथील कासवमित्र श्रीधर कोचरेकर व अनिल टांककर यांनी वनरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन ठिकाणी कुंपण करून संरक्षित केली होती. यापैकी रविवारी एका घरट्यामधून ७५, तर दुसऱ्या घरट्यामधून ४७ मिळून १२२ पिल्ले सकाळच्या सुमारास अंड्यातून बाहेर आली.

यासंबंधी वनविभागाला माहिती देताच सावंतवाडीचे सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, तुळस वनरक्षक एस. एस. कांबळे, वन कर्मचारी संतोष इब्रामपूरकर यांनी मोचेमाड समुद्रकिनारी दाखल होत पाहणी व पंचनामा केला. येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत या पिल्लांना मोचेमाड समुद्रात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.यावेळी सुधीर कोचरेकर, बाळा कोचरेकर, श्रीधर कोचरेकर, अनिल टांककर, राजाराम तांडेल आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यापूर्वीही २६ मार्चला या किनाऱ्यावर ६१ पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते. मोचेमाड समुद्र्रकिनारी अजूनही आॅलिव्ह रिडले प्रजातीची घरटी १२ ठिकाणी संरक्षित केली असून, एप्रिल व मे महिन्यात आॅलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना पाहण्याची पर्यटकांना संधी मिळणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforestजंगल