खारेपाटण : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटण या शिक्षण संस्थेला कणकवली तालुक्यातील नडगिवे (धुरेभाटलेवाडी) या गावचे सुपुत्र मनोज लहू गुळेकर यांनी ५५,५५५ रुपये एवढ्या रकमेची देणगी संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम धुमाळे यांच्याकडे सुपुर्द केली. या देणगीबद्दल संस्थेतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक मोहन कावळे, खारेपाटण वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, खारेपाटण हायस्कूलचे पर्यवेक्षक विलास फराकटे, मनोज गुळेकर यांचे सहकारी संकेत शशिकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने मुंबई विद्यापीठ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय चालविले जाते. या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी खारेपाटण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला होता.उद्योजक मनोज लहू गुळेकर यांनी संस्थेला दिलेल्या देणगीबद्दल संस्थेच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच संस्थेने हाती घेतलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या कामाला समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरूषोत्तम धुमाळे यांनी यावेळी केले.
बांधकामाची पाहणीमहाविद्यालयाच्या इमारतीसाठी मोठ्या आर्थिक देणग्यांची आवश्यकता आहे. याचाच भाग म्हणून नडगिवे गावचे तरूण उद्योजक मनोज लहू गुळेकर यांनी संस्थेला भेट देऊन कनिष्ठ महाविद्यालयाच्या बांधकामाची पाहणी केली तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी संस्थेला आर्थिक मदत म्हणून रोख ५५,५५५ रुपयांची रोख रकमेची देणगी सुपुर्द केली.