शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयाच्या महसुलात झाली भरघोस वाढ

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 18, 2023 6:33 PM

एकूण १४ हजार ८१ नवीन वाहनांची नोंद

सिंधुदुर्ग : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या २०२२-२०२३ आर्थिक वर्ष २०२१-२०२२ च्या तुलनेत महसूल वसुलीमध्ये १३.५५ कोटीची म्हणजेच ३२ टक्के इतकी वाढ झाली आहे. त्याशिवाय वाहन नोंदणीमध्ये दुचाकी २४००, चारचाकी २१२ तर परिवहन संवर्गात ५२५ ची वाढ झाल्याची माहिती  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांनी दिली आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील विविध वसुलीच्या माध्यमातून सुमारे ५६ कोटी ५२ लाख उत्पन्न मिळाले यामध्ये मोटार सायकल नवीन नोंदणी १० कोटी ७५ लाख, कार नवीन नोंदणी १९ कोटी ८५ लाख, परिवहन संवर्गातील नवीन वाहने १ कोटी ५५ लाख, जुना कर- ३ कोटी ६७ लाख, परिवहन वाहनांचा कर ६ कोटी ९ लाख, पर्यावरण कर १ कोटी १७ लाख, रस्ता सुरक्षा सेस ६८ लाख, शुल्क ८ कोटी ८९ लाख, तडजोड शुल्क (दंड) २ कोटी ८६ लाख, प्रवासी कर १ कोटी १ लाख अस एकूण ५६ कोटी ५२ लाख महसूल वसुली झाली आहे.नवीन वाहन नोंदणी कामकाजाचा आढावा घेण्यात आला असून एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ कालावधीत जिल्ह्यात दुचाकी १० हजार ६४७, चारचाकी १ हजार ८४४ परिवहन १ हजार ५९० अशा एकूण १४ हजार ८१ नवीन वाहनांची नोंद झाली आहे. गत आर्थिक वर्ष सन २०२१ -२०२२ च्या तुलनेत दुचाकी वाहन नोंदणीमध्ये २ हजार ४००, चारचाकी २१२ व परिवहन संवर्गातील वाहनामध्ये ५२५ ची वाढ झाली आहे. वायुवेग पथकाने वार्षिक लक्षांक (तडजोड शुल्क) १ कोटी २५ लाख असून वार्षिक पूर्तता १ कोटी ३० लाख इतकी केली आहे. याचे प्रमाण १०४ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३९.९७ टक्के इतकी वाढ आहे. सीमा तपासणी नाक्यांवरील कामगिरीमध्ये वार्षिक लक्षांक २ कोटी इतका होता त्याची  वार्षिक पूर्तता १०० टक्के करण्यात आली तर तडजोड शुल्क वार्षिक पूर्तता सुमारे १ कोटी ९४ इतकी होती तर  बाहेरील राज्यातून येणाऱ्या वाहनावरील कर १ कोटी ४० लाख असा एकूण ३ कोटी ३५ लाख ९ हजार इतका जमा झाला असल्याचे काळे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRto officeआरटीओ ऑफीस