कणकवली : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत तालुक्यातील २४ प्रस्तावांना येथील तहसील कार्यालयात आयोजित सभेत मंजूरी देण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजना समितीची सभा अध्यक्ष शिशिर परुळेकर यांच्या उपस्थितीत झाली.
यावेळी समिती सचिव तथा तहसीलदार वैशाली माने, गटविकास अधिकारी मनोज भोसले, समिती सदस्य रविंद्र शेट्ये, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार कडुलकर, व्ही.ए. जाधव , अक्षता बागवे आदी उपस्थित होते.या सभेत २४ प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या १९, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजना १ ,श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना गट 'ब' अंतर्गत ४ अशा प्रस्तावांचा समावेश आहे.या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या योजनेच्या ज्या लाभार्थ्यानी अद्याप हयातीचे दाखले सादर केले नाहीत त्यांनी जानेवारी महीना अखेर पर्यन्त ते तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत सादर करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले.