मालवण : मालवण-कसाल राज्य मार्गावर देऊळवाडा येथे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका यांच्या नावाने रस्त्यावरच श्राद्ध घातले.देऊळवाडा येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.याबाबत प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यात येऊनही याची दखल घेण्यात आली नाही. पावसामुळे या रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना खड्डे दिसून येत नाहीत. त्यामुळे या खड्ड्यात आदळून काही दुचाकीस्वार पडल्याच्या घटना घडल्या आहेत. शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.या मार्गावर गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी बुधवारी सकाळी येथील नागरिकांच्या वतीने श्राद्ध आंदोलन छेडण्यात आले. यावेळी श्रेयस माणगावकर, बाळा माणगावकर, दिनेश डिचवलकर, शरद मालवणकर, निखिल पारकर आदी नागरिक उपस्थित होते.
सिंधुदुर्ग: खड्डेमय रस्त्याप्रश्नी नागरिकांनी घातले श्राद्ध, बांधकाम विभाग व नगरपालिका टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 2:49 PM
मालवण-कसाल राज्य मार्गावर देऊळवाडा येथे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे संतप्त बनलेल्या नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका यांच्या नावाने रस्त्यावरच श्राद्ध घातले. देऊळवाडा येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ठळक मुद्देखड्डेमय रस्त्याप्रश्नी नागरिकांनी घातले श्राद्धबांधकाम विभाग व नगरपालिका टार्गेट