वैभववाडी : मी राणेंचा सैनिक असून त्यांनी २५ वर्षे मला डोक्यावर घेऊन नाचवले. पण काही लोकांची मस्ती जिरवण्यासाठी मी शिवसेनेकडे गेलो होतो. कोण म्हणतं राणेंना सोडून बाहेर गेलो? त्यांनीच तर मला शिवसेनेची 'आतील' माहिती काढण्यासाठी तिकडे खब-या म्हणून पाठविले होते. त्यामुळे आमदार नीतेश राणे सतत माज्या संपर्कात होते. तिकडचे काम संपले तसा आवश्यक माहिती घेऊन राणेंकडे परतलो आहे, अशी गुगली जयेंद्र रावराणे यांनी स्वाभिमान पक्ष प्रवेशानंतर बोलताना टाकली.वैभववाडी येथे झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या जाहीर सभेत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख जयेंद्र रावराणे यांनी चार वषार्पूर्वी बांधलेले 'शिवबंधन' तोडून 'स्वाभिमान'चा झेंडा हाती घेतला. त्यांच्या समवेत माजी पंचायत समिती सदस्य बाळा कदम व असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.तसेच मनसेचे माजी तालुका सहसंपर्क प्रमुख सुर्यकांत शेट्ये, उपाध्यक्ष संजय पाटील, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ राणे, करुळ येथील विकास कोलते, शरद कोलते, उत्तम कोलते, सचिन कोलते, ग्रा. पं. सदस्य रामचंद्र शिवगण, वाभवेचे माजी सरपंच सदानंद माईणकर, केतन सावंत, कल्पेश कदम, आदित्य तावडे, भाजप युवामोचार्चे तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, समाधान काडगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वाभिमानचा झेंडा घेत पक्षात प्रवेश केला. खासदार नारायण राणे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.मला मोठी जबाबदारी द्या!राणे कुटुंबाचा मी कट्टर समर्थक असून त्यांनी सांगितले तर मी कुस्तीच्या आखाड्यात उतरुन कुणालाही चितपट करुन दाखवेन. मग तो निष्ठावान असो किंवा 'चाच्या' असो! विरोधकांची पाठ लावतो; तोच खरा राणेंचा निष्ठावंत, असा टोला जयेंद्र रावराणे यांनी लगावला. त्यांच्या बोलण्याचा रोख तेथे उपस्थित काही पदाधिका-यांच्या दिशेने होता. त्याचवेळी राणेंनी मला तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्याबाहेर मोठी जबाबदारी द्यावी, अशी 'पदाची' अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्ग : शिवसेनेत राणेंचा खबऱ्या म्हणून गेलो होतो : जयेंद्र रावराणे, चार वर्षात तोडले शिवबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:03 PM
आमदार नीतेश राणे सतत माज्या संपर्कात होते. तिकडचे काम संपले तसा आवश्यक माहिती घेऊन राणेंकडे परतलो आहे, अशी गुगली जयेंद्र रावराणे यांनी स्वाभिमान पक्ष प्रवेशानंतर बोलताना टाकली.
ठळक मुद्देशिवसेनेत राणेंचा खबऱ्या म्हणून गेलो होतो : जयेंद्र रावराणेचार वर्षात तोडले शिवबंधनशिवसेना मनसे,भाजप कार्यकर्त्यांचा स्वाभिमानमध्ये प्रवेश