सिंधुदुर्ग : शिवडावमध्ये सुरू असलेल्या क्रशरमुळे ग्रामस्थांचे स्वास्थ्य बिघडले आहे. येथे मोठे सुरुंग लावल्याने घरांना तडे पडले आहेत. क्रशरवाले मुद्दामहून बागायतींना आग लावत आहेत. या क्रशरमुळे शिवडाव गाव पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे, अशी कैफियत शिवडाव ग्रामस्थांनी आमदार नीतेश राणे यांच्यासमोर मांडली.ग्रामसभेत क्रशरला विरोध करणाऱ्यांना धमकावले जात आहे. ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता आयुक्त स्तरावरून परवानगी आणून क्रशर सुरू करतात. ग्रामपंचायतीच्या ठरावांना प्रशासन स्तरावर काडीचीही किंमत दिली जात नाही. त्यामुळे क्रशर बंद करणे शक्य नसेल तर ग्रामपंचायतच बरखास्त करा, अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.ह्यगाव भेटह्ण कार्यक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील शिवडाव गावाला आमदार नीतेश राणे यांनी शनिवारी भेट दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद सदस्या संजना सावंत, सरपंच वनिता जाधव, उपसरपंच लवू वाळके यांच्यासह अजित तांबे, सुनील साळसकर, बाळा मेस्त्री, पपू गावकर, रविकांत सावंत, विनोद गावकर, भाई गावकर, आत्माराम सावंत, चंदू शिरसाट, अमेय सावंत, ग्रामसेवक केदार, जानबा गावकर आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.शिवडाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेकायदेशीररित्या काळ्या दगडाचे उत्खनन केले जाते. ग्रामपंचायतीची परवानगी नसताना क्रशर सुरू केले जातात. आणखी तीन क्रशर उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वीच्या सुरू असलेल्या सात क्रशरने अर्ध्याअधिक गावात उत्खनन केले आहे.
अडीचशे-तीनशे लोकांच्या ग्रामसभेने क्रशरविरोधात ठराव घेतल्यास आणि ना हरकत दाखले देणे बंद केल्यास क्रशर चालकांकडून दादागिरी केली जाते. गेली १० ते १२ वर्षे ग्रामस्थांचा या विरोधात लढा सुरूच आहे. मात्र, क्रशर माफीया आयुक्त स्तरावरून परस्पर परवानग्या आणून उत्खनन करीत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा पूर्णत: ºहास झाला आहे.पूर्वी शिवडाव हे काजू उत्पादनासाठी महत्त्वाचे गाव होते. याठिकाणच्या शेतकºयांची रोजीरोटी, काजू, ऊस बागायती, भाजीपाला यावर चालत असे. क्रशरमुळे सर्वत्र धुळीचे थर या बागायतीवर साचलेले आहेत. या सर्व संकटातून आम्हांला वाचवा. काही उत्खननाच्या खाणी रस्त्यांवरच असल्याने भूसुरुंगामुळे प्राणहानी होऊ शकते, अशी चिंता यावेळी ग्रामस्थांनी आमदार नीतेश राणे यांच्यासमोर व्यक्त केली.शिवडाव गावावर अन्याय होऊ देणार नाहीशिवडाव ग्रामस्थांवर अन्याय होऊ देणार नाही. क्रशरला तसेच गावात होणाºया उत्खननाबद्दल ग्रामस्थांच्या असलेल्या तीव्र भावना मला कळल्या आहेत. या संदर्भात खासदार नारायण राणे यांच्याशी चर्चा करण्यात येईल.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत आपण एकत्ररित्या बैठक घेऊ. गावातील प्रमुखांचे एक शिष्टमंडळ माझ्यासोबत या. कोकण आयुक्तांशीही मी या संदर्भात बोलणार आहे. याचबरोबर उन्हाळी अधिवेशनात शिवडाव गावाला क्रशरमुळे होणाºया त्रासाबद्दल आवाज उठवून तुम्हांला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन यावेळी आमदार नीतेश राणे यांनी दिले.