कणकवली : लोकमतचे संस्थापक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी लोकमतच्या कणकवली येथील जिल्हा कार्यालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळच्या सत्रात पावसाची संततधार असतानाही रक्तदात्यांनी पवित्र दान करून बाबुजींना श्रद्धांजली वाहिली.दरवर्षी लोकमत परिवाराच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा राज्यात स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सामाजिक दृष्टीकोनातून सध्या असलेली रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो.
कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते सकाळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पालव, चिरायु आयुर्वेद हॉस्पिटलच्या डॉ. तेजस्विनी हर्याण, अधिपरिचारिका डॉ. हेमांगी रणदिवे, वैद्यकीय समाजसेवक किशोर नांदगावकर, लोकमत आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक तसेच लोकमतमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.त्यानंतर जिल्हा रक्तपेढीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिराला सुरुवात केली. दुपारी २ वाजेपर्यंत समाजातील विविध स्तरातील लोकांनी आणि लोकमत कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष या शिबिरात सहभाग घेतला होता. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सुरू झालेल्या आणि ही बांधिलकी कायम जपणाºया लोकमततर्फे बाबूजींच्या जयंतीदिनी रक्तदान शिबिराचा उपक्रम सातत्यपूर्ण राबविला जात आहे.लोकमत हे राज्यातील सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक असून सामाजिकदृष्ट्या रक्तदानासारखा पवित्र उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने राबवित आहे, हे कौतुकास्पद आहे. रक्ताची समाजाला गरज आहे आणि ती भरून काढण्यासाठी लोकमत खारीचा वाटा उचलत आहे, अशा शब्दात समीर नलावडे यांनी गौरवोद्गार काढले.रुपालीचा महिला, विद्यार्थ्यांसाठी आदर्शदेवगड तालुक्यातील साळशी येथील रुपाली अनिल पोकळे या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने साळशी येथून आपल्या वडिलांसमवेत कणकवलीत दुचाकीवरून येऊन रक्तदान केले. ती बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स या विषयात शिक्षण घेतअसून तिला रक्तदान करण्याची इच्छा होती. लोकमतमध्ये रक्तदानाबाबत आलेली बातमी वाचून तिने कणकवलीत येत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच इतर महिला व विद्यार्थ्यांसाठी रक्तदानाबाबतचा आदर्श घालून दिला आहे.रक्तदात्यांचा सहभागरक्तदान करणाऱ्यामध्ये संदीप गावडे, विवेक राणे, लक्ष्मण आडाव, तानाजी आयवाळे, महेश सरनाईक, गिरीश परब, महेंद्र पिळणकर, विशाल सावंत, संजय एकावडे, सतीश धामणकर, दत्तात्रय पाटील, अमित साटम, सिध्देश आचरेकर, रूपेश सुतार, सीताराम गावकर, रूपाली पोकळे, संतोष मराठे, अभिषेक चव्हाण, रूपेश वाळके, सत्यवान कानडे यांनी रक्तदान केले.