सिंधुदुर्गनगरी : नाचता येईना अंगण वाकडे अशी स्थिती पालकमंत्र्यांची झाली आहे. त्यामुळे ते आपल्या अपयशाचे खापर फोडत आहेत. पूर्वी राणे विकास करायला देत नाहीत आणि आता अधिकारी विकास करायला देत नाहीत अशी ओरड मारत आहेत. आपल्याला अधिकारी ऐकत नाहीत. नकारात्मक आहेत असा आरोप खुद्द पालकमंत्री दीपक केसरकर यांनी करीत २०१४ पासून आम्ही ओरड मारीत असलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब केले आहे. मुळात केसरकर यांनाच प्रशासन चालवायला जमत नाही. त्यामुळे त्यांनी अधिकारी वर्गावर खापर फोडण्यापेक्षा आपली मानसिकता बदलावी. तसेच जिल्ह्यातील जनतेच्या भल्यासाठी आमदार व मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.सतीश सावंत म्हणाले, जिल्हा नियोजन सभा होऊन तीन महिने उलटले तरी जिल्हा नियोजनच्या निधीचे वाटप करण्यात आलेले नाही. जिल्हा परिषदेच्या कामांची यादी दिलेली नाही. सभेच्या इतिवृतावर स्वाक्षरी घेण्यासाठी केसरकर यांच्याकडे अधिकारी हेलपाटे मारीत आहेत. यावरून पालकमंत्री केसरकर यांना प्रशासनातील काही समजत नाही, हे स्पष्ट होत आहे. त्यांच्या फक्त पोकळ घोषणा व ह्यमी निधी आणलाह्ण या वलग्नाच असतात, असाही आरोप सावंत यांनी केला.केसरकर यांच्या एवढा निष्क्रिय पालकमंत्री जिल्ह्याला आतापर्यंत लाभलेला नाही. त्यामुळे नारायण राणे व त्यांची तुलना होऊ शकत नाही. आतापर्यंत राणे काम करू देत नाहीत असा आरोप केला. आता अधिकारी यांचे नाव घेतात. मुळात जिल्ह्यातील अधिकारी सकारात्मक आहेत. त्यांच्या शिवाय जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही. आपली निष्क्रियता झाकण्यासाठी केसरकर यांनी सुरु केलेले दोषारोप जिल्ह्यातील जनतेपुढे झाकले जाणार नाहीत, असाही आरोप सावंत यांनी केला.चांदा ते बांदा योजना जिल्हा बँकेकडे द्याशासनाने चांदा ते बांदा ही महत्वाकांशी योजना सुरु केली आहे. मात्र पालकमंत्री केसरकर यांच्याकडे योग्य नियोजन नसल्याने ७८ बैठका घेवूनही योजना यशस्वी झालेली नाही. हे ही एक त्यांचे एक अपयश आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी ही योजना निधीसह जिल्हा बँकेकडे द्यावी आपण या योजनेची १५ दिवसात अंमलबजावणी करून दाखवू असे आव्हानही सतीश सावंत यांनी यावेळी दिले आहे.
सिंधुदुर्ग :नाचता येईना अंगण वाकडे अशी पालकमंत्र्यांची स्थिती : सतीश सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:44 AM
केसरकर यांनाच प्रशासन चालवायला जमत नाही. त्यामुळे त्यांनी अधिकारी वर्गावर खापर फोडण्यापेक्षा आपली मानसिकता बदलावी. तसेच जिल्ह्यातील जनतेच्या भल्यासाठी आमदार व मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.
ठळक मुद्देनाचता येईना अंगण वाकडे अशी पालकमंत्र्यांची स्थिती : सतीश सावंतपूर्वी राणे, आता अधिकारी विकास करू देत नसल्याची मारत आहेत ओरड