शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

सिंधुदुर्ग :  हुंबरठमधील अभियंत्याचा लेप्टोने मृत्यू, आरोग्य केंद्रामार्फत सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 5:10 PM

कणकवली तालुक्यातील हुंबरठ-पिंपळवाडी येथील सिध्देश चंद्रकांत माणगांवकर (२७) याचा मुंबई-भांडूप येथे लेप्टोस्पायरोसीसने मृत्यू झाला. अभियंता असलेला सिध्देश हा मुंबईत खासगी कंपनीत नोकरीला होता.

ठळक मुद्दे हुंबरठमधील अभियंत्याचा लेप्टोने मृत्यूमुंबईत खासगी कंपनीत नोकरीला : आरोग्य केंद्रामार्फत सर्वेक्षण

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील हुंबरठ-पिंपळवाडी येथील सिध्देश चंद्रकांत माणगांवकर (२७) याचा मुंबई-भांडूप येथे लेप्टोस्पायरोसीसने मृत्यू झाला. अभियंता असलेला सिध्देश हा मुंबईत खासगी कंपनीत नोकरीला होता.

प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला उपचारासाठी मुंबईत मुलुंड येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर हुंबरठ गावात शोककळा पसरली आहे.सिध्देश याने हरकुळ बुद्रुक येथील एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर तो आईवडिलांसमवेत मुंबई-भांडूप येथे राहत होता. मुंबईतील एका बांधकाम कंपनीत अभियंता म्हणून तो नोकरीला होता. ३० जून रोजी तो आईवडिलांसमवेत शेतीच्या कामासाठी हुंबरठ येथे गावी आला होता. लावणीची कामे झाल्यानंतर हे कुटुंबीय ६ जुलै रोजी मुंबईला गेले.गावी असताना त्याला कोणतीही तापाची लक्षणे नव्हती. मात्र मुंबईत गेल्यानंतर १३ जुलै रोजी त्याला उलटीचा त्रास झाल्याने उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याची प्रकृती अत्यवस्थ बनली होती. त्याला श्वसनाचा त्रास होत होता.

रूग्णालयात दाखल केल्यापासून तो बेशुध्दावस्थेतच होता. प्रकृती अधिक गंभीर होत त्याचा मृत्यू झाला. लेप्टोस्पायरोसीसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे रूग्णालयाकडून सांगण्यात आले. सिध्देशच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत हुंबरठ-पिंपळवाडीमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यात तापाचा रूग्ण आढळून आला नाही.खबरदारीच्या उपाययोजनांविषयी नागरिकांना माहिती देण्यात आली, असे कणकवली तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सिध्देश याच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग