सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील बंदर व जलवाहतुकीच्या प्रलंबित प्रश्नावर मच्छिमार नेते आनंद हुले यांनी वेंगुर्ले कार्यालयात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी-उगलमागले यांच्याशी चर्चा केली. निवती ते शिरोड्यातील मच्छिमार प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
बऱ्याच विषयावर चर्चेनंतर समाधानकारक कार्यवाही निघाली. सर्व योजनांवर विचार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रादेशिक बंदर अधिकारी उगलमागले यांनी केली. यानुसार आनंद हुले एक-दोन महिन्यात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला प्रस्ताव सादर करणार आहेत.सिंधुदुर्ग किनारपट्टटीचे अर्थकारण पर्यटन व मच्छिमारीवर अवलंबून आहे. बंदरातील गाळ काढण्याची कार्यवाही व बंदरातील प्रवासी टर्मीनसमधील सोयीबाबत सद्यपरीस्थितीत सिंधुदुर्गातील बंदरे व खाड्या गाळाने भरल्याने पर्यटक व्यावसायीक व मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत पर्यटनविकासातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे विजयदुर्ग, मिठबाव, देवगड, तारकर्ली, तोंडवळी, सागरेश्वर, मोचेमाड, शिरोडा या पर्यटन स्थळी पर्यटन मंडळातर्फे ३० कोटींच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. परंतु, गाळ न काढल्यास स्वदेश दर्शन योजनाच अडचणीत येऊ शकते.वेगुर्ले बंदर गाळाने भरू नये म्हणून मांडवी खाडीत ब्रेक वॉटर बंधारा घालणे आवश्यक आहे अशा सूचना आनंद हुले यांनी केल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी- यांनी मुख्य बंदर अधिकारी-महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड- वेंगुर्ले, बंदर (पत्तन) अधिकारी यांना याविषयी ३० दिवसात अहवाल सादर करण्यास सूचना जानेवारी २०१७ मध्ये दिल्या होत्या. परंतु अद्याप निधीअभावी कारवाई शून्यच आहे.सध्या निधीअभावी मांडवी खाडीत ब्रेक वॉटर बंधारा घालणे तत्काळ शक्य होणार नाही. परंतु पर्यटन व मच्छिमारी प्रकल्प अडू नये मांडवी खाडीतील गाळ काढण्याची कार्यवाहीसाठी यु ट्यूब तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. याचे सर्वेक्षणही केले गेले आहे. यामुळे पुढील ५ वर्षे मांडवी खाडीतील गाळाची समस्या सुटणार आहे. याच्या यशस्वीतेनंतर सिंधुदुर्गातील बंदरे व खाड्यात ही यु ट्यूब तंत्रज्ञान वापरून गाळाची समस्या दूर केली जाईल.सिंधुदुर्गवरील किनारपट्टीवरील प्लास्टिक भस्मासुरामुळे पर्यटन व मच्छिमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. प्लास्टिक कचऱ्याची महापालिका कलम १९४ अन्वय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे विल्हेवाट लावली जात नाही.
प्लास्टिक निर्मूलनासाठी निर्मल तट अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्लास्टिक व ग्लासचा पुनर्वापर करणे आवश्यक आहे. यावर बंदर अधिकारी उगलमागले यांनीही खेद व्यक्त करीत सांगीतले की प्लास्टिक निर्मूलनासाठी निर्मल तट अभियानाअंतर्गत सिंधुदुर्गवरील किनारपट्टीवरील २२ ग्रामपंचायतीना निधी उपलब्ध करून दिला. परंतु आजपावेतो कोणीच अहवाल सादर केला नाही.रेडी व कोचरे-वेंगुर्ले-सिंधुदुर्ग येथील ५० वर्षापूर्वी बुडालेल्या बोटीमुळे स्थानिक मच्छिमारांना त्रास होत आहे. मच्छिमारांचे पुढील आर्थीक नुकसान टाळण्यासाठी बोटीचे सर्वेक्षण करून बाहेर काढण्यास मंजूरी द्यावी अशी मागणी आनंद हुले यांनी केली.नोव्हेंबरला डॉल्फीन मित्र श्रीधर मेथर यांच्यातर्फे निवती-वेंगुर्ला-सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय जलतरण स्पर्धा भरवल्या जाणार आहे. या स्पर्धा सुरक्षिततेचे नियम व शासनाचे कायदे पाळून केल्या जाव्या अशी सूचना उगलमागले यांनी केली.वेगुर्ले बंदरावरील जेटी निष्काषित करून तेथे नवीन पाईल जेटी बांधण्याचा ८ कोटींचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने चांदा ते बांदा या योजनेन्वये पाठविला आहे व पालकमंत्री दीपक केसरकरांनी बंदराचे काम लवकरच पूर्ण होईल अशी जाहीर घोषणा वेगुर्ल्यात केली होती. परंतु अद्याप वेंगुर्ले बंदराचा विकास आराखड्याला मंजुरी नाही.सागरमाला योजनेतून सर्जेकोट बहुउद्देशीय जेटी विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला सजेकोट मच्छिमार सोसायटीने विनंतीपत्र दिले होते. त्यावर फ्लोटींग जेटीचा विचार व्हावा अशी मागणी आनंद हुले यांनी केली.सिंधुदुर्गातील पर्यटन विकास व्हावावेंगुर्ले रॉक येथील निवती दिपगृहावर हा भाग विकसीत केल्यास सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येतील ही भूमीका आनंद हुले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबधित अधीकाऱ्यांच्या बैठकीत मांडली होती. ६ महिन्यात वेंगुर्ले रॉक येथे भारतालील पहिले दिपगृह पर्यटन विकासीत होईल. येथे पर्यटकांना नेण्यासाठी मालवण, वेंगुर्ला बंदर ते वेंगुर्ला रॉक पर्यटक बोटसेवा स्थानीक मच्छिमारांना चालविण्यास देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी आनंद हुले यांनी केली .
सध्या मालवण/वेंगुर्ला बंदराची अवस्था दयनीय आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोडार्ची वास्तूही मोडकळीस आली आहे. पर्यटकांना साधे पाणी-नाश्ताची सोयही जेटीवर नाही. गोव्यातील पणजी/बेतीम च्या धर्तीवर पर्यटकासाठी विकसकातर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना आनंद हुले यांनी केली. तिकीट बुकींगसाठी एक खिडकी योजना राबविण्याची सूचना आनंद हुले यांनी केली जेणेकरून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला पर्यटन उपक्रमातून मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होईल.लॉजिस्टीक पार्क विकसीत करण्यासाठी सवलतीचीनमधील आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेत आनंद हुले यांचे ह्यकोकणातील उद्योगांच्या संधीह्ण या भाषणानंतर काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कोकणात लॉजिस्टीक पार्क विकसीत करण्यास उत्सुकता दर्शवली आहे. सिंगापूर-कोलंबोपेक्षा कोकणातील बंदरात लॉजीस्टीक पार्क विकसीत करणे आता बहुराष्ट्रीय कंपन्यांना किफायतशीर वाटू लागले आहे.
२०१० साली महाराष्ट्र शासनाने भरविलेल्या बंदर परीषदेत आनंद हुले यांनी कोकणाचा प्रतिनीधी म्हणून कोकणातील बंदराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व बंदरविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मांडली होती. त्याची दखल घेत बंदरे ( गृह) विभाग सचिव संगीतराव यांनी २० आॅगस्ट २०१० केलेल्या अधिसुचनेनुसार कोकणातील बंदरात लॉजीस्टीक पार्क विकसीत करण्यासाठी भरघोस सवलती दिल्या गेल्या आहेत.
सर्जेकोट बंदर विकसीत करावेमुंबई-गोवा मार्गावर येत्या २० आॅक्टोबरपासून सी ईगल व्हेंचर या कंपनीतर्फे आंग्रीया क्रुझ पर्यटक बोटसेवा- क्रुझसेवा सुरू होत आहे. सर्जेकोट बंदर विकसीत करताना भाऊच्या धक्याप्रमाणे असे बहुद्देशीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रवासी टर्मीनस म्हणून विकसीत केले पाहिजे की येत्या आक्टोबरपासून पर्यटक बोटसेवा सुरू होणारी ईगल व्हेंचरची आंग्रीया क्रुझ बंदरात थांबली पाहिजे.