बांदा : मडुरा येथून कुडाळच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारुची कारमधूून बेकायदा वाहतूक करताना बांदा पोलिसांनी थरारक पाठलाग करून कारवाई करीत ८१ हजार रुपये किमतीच्या दारुसह एकूण ४ लाख ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. बेकायदा दारू वाहतूकप्रकरणी रुपेश अर्जुन नाईक (२८, रा. न्हावेली-देउळवाडी) व राजाराम पांडुरंग मांजरेकर (४२, रा. झाराप-घाडीवाडी) यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.मडुरा येथून गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांना मिळाली होती. त्यानुसार मडुरा येथे कळेकर यांनी आपले सहकारी हवालदार प्रसाद कदम, संजय कदम, महेंद्र बांदेकर यांच्यासह सापळा रचला होता.मडुरा येथून भरधाव वेगात आलेल्या कारला (एमएच. 0४, डीएन ९६३७) तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा करण्यात आला. मात्र कारचालकाने तेथून भरधाव वेगात बांद्याच्या दिशेने पलायन केले.बांदा पोलीस पथकाने कारचा थरारक पाठलाग केला. तब्बल दहा किलोमीटर पाठलाग करीत कारला नेमळे येथे पकडण्यात आले. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.कारच्या डिकीत दारुचे बॉक्सपोलिसांनी कारची तपासणी केली असता कारच्या डिकीत व पाठीमागील सिटवर गोवा बनावटीच्या दारुचे बेकायदा बॉक्स आढळले. पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारुचे १८0 मिली मापाचे ८१ हजार रुपये किमतीचे एकूण ४५ बॉक्स व ४ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ४ लाख ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.