शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
3
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
4
AUS vs IND BGT : ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात'
5
“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे
6
"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?
7
"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी
8
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
9
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
10
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल
11
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
12
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
13
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
14
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
15
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
16
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!
17
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
18
कोण आहे अमन देवगण? 'आजाद'मधून करतोय पदार्पण, अजय देवगणसोबत आहे हे कनेक्शन
19
'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे नवे आरोप; म्हणाली, "ती माझ्या आईच्या बेडवर..."
20
सीमेवर नवी ताकद... आता भारतीय लष्कराला मेड इन इंडिया ASMI शस्त्र मिळणार!

सिंधुदुर्ग नगररचना अधिकाऱ्यांना दिला रंगाचा डबा अन् ब्रश, शिवसेनेचे अनोखे आंदोलन

By सुधीर राणे | Published: April 20, 2023 2:52 PM

आपल्या मर्जीतील व्यक्तींच्या जमिनीबाबत वेगळी भूमिका घेऊन  शहरवासीयांची फसवणूक करण्याचे काम सत्ताधारी नगरसेवक करत असल्याचा आरोप

कणकवली: कणकवली शहर विकास आराखडा सादर करण्याची उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांनी वारंवार मागणी करूनही सिंधुदुर्ग नगररचना विभागाकडून अद्याप तो सादर करण्यात आलेला नाही. मात्र, कणकवलीचे उपनगराध्यक्ष काही व्यावसायिकांशी संपर्क करून ग्रीन झोनमध्ये असलेल्या जमिनी यलो झोन करून देण्याचे खात्रीशीर सांगत आहेत.त्यासाठीच हा आराखडा सादर करण्यास विलंब लागत आहे का? असा सवाल शिवसेना शहरप्रमुख उमेश वाळके यांनी ओरोस येथील नगररचना विभागाच्या कार्यालयात जात अधिकाऱ्यांना विचारला. तसेच कणकवलीचा सर्व शहर विकास आराखडा यलो करण्यासाठी अधिकाऱ्यांना रंगाचा डबा व ब्रश देऊन अनोखे आंदोलन केले. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक व कन्हैया पारकर उपस्थित होते.गेल्या काही महिन्यांपूर्वी कणकवली शहर विकास आराखडा तयार करण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत तो सादर करण्यात आलेला नाही. त्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी ओरोस येथील नगररचना विभागात भेट देऊन लवकरात लवकर शहर विकास आराखडा सादर करण्याची वारंवार मागणी केली. त्यावर अधिकाऱ्यांकडून केवळ तारखा देण्यात आल्या. यातील शेवटची तारीख २४ मार्च  देण्यात आली होती. मात्र, त्यालाही एक महिना होत आला तरी देखील आराखडा अद्याप सादर केलेला नाही. कणकवलीचे उपनगराध्यक्ष काही व्यवसायिकांना फोन करून ज्यांच्या जमिनी ग्रीन झोन मध्ये आहेत त्यांच्या जमिनी यलो झोन करण्याची खात्री देत आहेत. नागवे रोड येथील एक जमीन यलो केल्याची माहिती मिळत आहे. आपल्या मर्जीतील व्यक्तींच्या जमिनीबाबत वेगळी भूमिका घेऊन  शहरवासीयांची फसवणूक करण्याचे काम सत्ताधारी नगरसेवक करत असल्याचा आरोप उमेश वाळके यांनी केला असून यासाठीच शहर विकास आराखडा सादर करण्यास विलंब होत आहे का?असा सवाल  उमेश वाळके यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे