कुडाळ : कोकणामध्ये मनसे पक्ष जोमाने वाढण्यासाठी मुंबईतील चाकरमानी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा ८ सप्टेंबर रोजी मुंबई येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर १५ सप्टेंबर रोजी कुडाळ येथे मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२०१९ सालच्या निवडणुकीमध्ये मनसे स्वतंत्र निवडणुका लढणार असल्याचे जाहीर करीत येथील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, बाबल गावडे, दीपक गावडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी उपरकर यांनी सांगितले की, कोकणामध्ये मनसेची पक्ष संघटना जोमाने वाढण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे मुंबईतील चाकरमानी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत त्यांना सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व चाकरमान्यांची सभा मुंबई येथे राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजिली आहे.
मुंबईतील या सर्व चाकरमान्यांची यादी मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी बनविली असून यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर येथील चाकरमान्यांचा समावेश आहे. यामधील जे चाकरमानी इच्छुक आहेत त्यांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात पक्ष संघटना वाढीची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.उपरकर यांनी आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी व युतीतील शिवसेना व भाजप या पक्षांच्या सत्तेतील कारभारावर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना भाजप या सर्व पक्षांची सत्ता या कोकणाने अनुभवली आहे. मात्र केवळ घोषणाबाजी करण्यापलीकडे या सर्वांनी कोकणाला व येथील जनतेला काहीच दिले नसून येथील विकास ठप्प झाला आहे, असे त्यांनी सांगितले. या जिल्ह्यातील खासदार, आमदार कोट्यवधी निधी आणल्याच्या पोकळ घोषणा करतात. प्रत्यक्षात मात्र निधी आणत नसून आलेल्या निधीचा नियोजनबद्ध खर्च केला जात नाहीगृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंदे : उपरकरजिल्ह्याचे पालकमंत्री हेच राज्याचे गृहराज्यमंत्री असून त्यांच्या मतदारसंघात दारू, गुटखा यांच्या साठ्यावर धाडी पडत आहेत. तसेच आंबोली घाटात मृतदेह टाकण्यासारखे प्रकारही घडत असून गृहराज्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा टोला उपरकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना लगावला.रस्त्यावरील खड्डे दाखवा व रोख एक हजार रुपये बक्षीस मिळवा, अशी घोषणा सत्तेतील बांधकाममंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र येथील सर्वच रस्ते खड्डेमय झाले असल्याने आता आम्ही विना खड्डे रस्ते दाखवा व मनसेकडून एक हजार रुपये बक्षीस मिळवा, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.या जिल्ह्यातील सत्ताधारीच जिल्ह्यातील बिघडलेली आरोग्य, दूरसंचार यंत्रणा, खड्डेमय रस्ते या विरोधात आंदोलने करीत असल्याने त्यांचे मंत्री या जिल्ह्यात काहीच काम करीत नसल्याचे सत्ताधाºयांनी दाखवून दिले असल्याचाही टोलाही त्यांनी लगावला.