वैभववाडी : वैभववाडी तालुका विकासात पुढे कसा जाईल यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन करीत स्थानिक कलाकारांना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आम्ही वैभववाडीकरच्या माध्यमातून केलेला प्रयत्न स्तुत्य आहे, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले.आम्ही वैभववाडीकर आयोजित महाराष्ट्राची संस्कृती हा कार्यक्रम येथील पृथ्वीराज पॅलेसच्या रंगमंचावर झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, नगराध्यक्ष संजय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी सभापती लक्ष्मण रावराणे, नगराध्यक्ष संजय चव्हाण, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, उपनगराध्यक्षा संपदा राणे, बांधकाम सभापती समिता कुडाळकर, स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे, मुंबईचे माजी नगरसेवक अजित रावराणे, उद्योजक विकास काटे, बाप्पी मांजरेकर, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मनोज सावंत, नगरसेविक रवींद्र तांबे, अक्षता जैतापकर, सुनील रावराणे, आम्ही वैभववाडीकर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन समितीचे अध्यक्ष महेश रावराणे, मंगेश कदम, संतोष टक्के, रणजित तावडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक महेश रावराणे यांनी केले तर सूत्रसंचालन संजीवनी पाटील व संतोष टक्के यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश कदम, संतोष टक्के, संजय लोके, महेश रावराणे, विद्याधर सावंत, अंकुश जाधव, मुकुंद रावराणे, सचिन सावंत, सुधाकर रावराणे, उज्ज्वल नारकर, ओंकार कदम, संजीवनी पाटील, निलोफर शेख, शितल पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.सांस्कृतिक परंपरेचे दर्शनस्थानिक कलाकारांनी मराठमोळ्या वेशभूषेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. यामध्ये कोळीगीत, वारकरी दिंडी, गोंधळ, मंगळागौर, भजन, झिम्मा फुगडी, आदिवासी नृत्य यांसारखे बहारदार कार्यक्रम सादर केले. तसेच शिवचरित्ररुपी नाटिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या बालपणापासून संभाजी राजेंच्या वधापर्यंतचा संपूर्ण ऐतिहासिक कालखंड हुबेहूब साकारला. ही ऐतिहासिक नाटिका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.