सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सत्तेत असताना पर्ससीनच्या बाजूने होते. मग आताच त्यांना छोट्या मच्छिमारांचा पुळका कसा काय आला आहे? पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच असून गुन्हा दाखल असलेल्या मच्छिमारांच्या बोटीवरून मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे राणेंची टीका निरर्थक असल्याचे मत राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी मंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले, नारायण राणे हे नेहमीच टीका करतात. त्यांचा पोलीस कारवाईवर नेहमीचे आक्षेप असतो. पण त्यांनी म्हटले म्हणून एखादी गोष्ट बदलायची का? पोलीस आपले काम करतच राहणार असे सांगत गोव्यातील मच्छिमारांनी दिलेल्या तक्रारीची स्थानिक मच्छिमारांकडे खात्री करण्यात आली. दिलेल्या तक्रारीमध्ये तथ्य असल्यानेच पोलिसांनी कारवाई केली आहे.गोव्यातील बोटीवर ही कारवाई केली आहे. येथील मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांच्याबाबत तक्रारी होत्या. या तक्रारीनंतर त्यांना तत्काळ बदलण्यात आले आहे. शासन नेहमी मच्छिमारांच्या बाजूने राहणार आहे. छोट्या मच्छिमारांच्या अडचणी आहेत. त्याही आम्ही सोडविणार असून त्यांना लवकरच दिलासा दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.आताच छोट्या मच्छिमारांचा पुळका कसा?माजी खासदार निलेश राणे यांनी पोलीस अधीक्षक हटावची मागणी केली आहे. त्यावर बोलताना मंत्री केसरकर यांनी नारायण राणे सत्तेमध्ये असताना ते नेहमी पर्ससीनच्या बाजूने राहिले. मग आताच त्यांना छोट्या मच्छिमारांचा पुळका कसा काय आला? असा सवाल त्यांनी केला.पर्ससीनद्वारे मासेमारी करण्यासाठी गोवा, कर्नाटक येथील बोटी मोठ्या प्रमाणात हद्दीच्या आतमध्ये येत होत्या. पण मी गृहखात्याचा कारभार हाती घेतल्यापासून मत्स्य विभागाच्या मदतीला पोलिसांच्या स्पीड बोटी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे
सिंधुदुर्ग : सत्तेत असताना राणे पर्ससीनच्या बाजूने होते, दीपक केसरकर यांची टीका, पोलीस कारवाईचे केले समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 4:18 PM
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सत्तेत असताना पर्ससीनच्या बाजूने होते. मग आताच त्यांना छोट्या मच्छिमारांचा पुळका कसा काय आला आहे? पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच असून गुन्हा दाखल असलेल्या मच्छिमारांच्या बोटीवरून मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे राणेंची टीका निरर्थक असल्याचे मत राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ठळक मुद्देसत्तेत असताना राणे पर्ससीनच्या बाजूने होते : दीपक केसरकर पोलीस कारवाईचे केले समर्थन