आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. २६ : कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने सलग सहा वेळा प्राविण्य मिळविले आहे. यंदाच्या वर्षी तर जिल्ह्यातील १0९ शाळांचा १00 टक्के निकाल लागला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी. सारख्या परीक्षांसाठी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरु करण्यात यईल अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली.मार्च २0१७ मध्ये झालेल्या दहावी, बारावी परीक्षेतील यशस्वी, गुणवंत विद्यार्थी, १00 टक्के निकाल लावणा-या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व संस्था चालकांचा गौरव सोहळयात पालकमंत्री केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभात मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, नागेंद्र परब, खोबरेकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मातोंडकर, सचिव कुसगावकर, संस्था संचालक प्रतिनिधी आत्माराम राऊळ, दोडामार्ग पंचायत समितीचे सभापती नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.शिक्षणावर राज्याच्या बजेटच्या २५ टक्के म्हणजे ४५ हजार कोटी रुपये खर्च करणारे महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, शिक्षण संस्थांचा कारभार आदर्श शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे कष्ट व जिल्ह्यांच्या समन्वयाने शिक्षण तंत्रात सिंधुदुर्ग अग्रेसर आहे. स्पर्धा परीक्षा बाबत कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन हवे आहे या बाबत विद्यार्थी-शिक्षकांनी विधायक सूचना करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी गुणवंत विद्यार्थी, संस्थाचालक, मुख्याध्यापक यांचा केसरकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.यावेळी दहावी परीक्षेत १00 टक्के गुण मिळविणा-या बारा विद्यार्थी तसेच दहावी व बारावी परीक्षेत १00 टक्के निकाल लावणा-या २७ शाळा तसेच दहावी परीक्षेत १00 टक्के निकाल लावणा-या १0९ शाळांचा गौरव करण्यात आला.प्रारंभी शिक्षणाधिकारी रंगराव काळे यांनी प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तन्वी संतोष कदम, रोहित गंगाराम कोकरे यांनी सत्काराला उत्तर देताना उच्च शिक्षणातही असेच यश कायम राखू अशी ग्वाही दिली. आभार प्रदर्शन निरोप अजय पाटील यांनी केले.
सिंधुदुर्गात लवकरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणार : केसरकर
By admin | Published: June 26, 2017 7:08 PM