तळवडे : जिल्ह्यातील तरुणांना नोकरीच्या संधी निर्माण करण्याच्यादृष्टीने विकासात्मक प्रकल्प राबविण्यासाठी येत्या काळात प्रत्यक्ष कृतिदर्शक पावले उचलण्यात ेयेणार आहेत. या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा देशातील सर्वांत श्रीमंत जिल्हा बनविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मळगाव येथे मळगाव सचिवालयाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.मळगाव (ता. सावंतवाडी) येथे ग्रामसचिवालयाच्या इमारतीचे भूमिपूजन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पंचायत समिती सदस्य वर्षा हरमलकर, मळगावचे सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, सावंतवाडी उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे, वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती सुचिता वजराटकर, नियोजन समितीचे सदस्य प्रकाश परब, गटविकास अधिकारी मोहन भोई, उपसरपंच देवयानी राऊळ, गजानन सातार्डेकर, विजय हरमलकर, दिलीप सोनुर्लेकर, गटनेते अशोक दळवी, आनंद देवळी, वेत्येचे सरपंच सुनील गावडे, तळवडे मतदारसंघाचे विभागप्रमुख विनोद काजरेकर, उपविभागप्रमुख महेश शिरोडकर, तळवडेचे शाखाप्रमुख प्रशांत बुगडे, विजय राऊळ, मळगाव ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, गाव विकास घडवायचा असेल, तर ग्रामस्थांची एकजूट महत्त्वाची आहे. त्याची प्रचिती मळगावात येते. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे. मळगावमध्ये रेल्वे टर्मिनस निर्माण झाले. त्यामुळे भावी काळात याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येणार असून, पर्यटनाच्या माध्यमातून या भागाचा विकास होणार आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास भावी काळात होणार आहे. जिल्ह्यातील एकही कुटुंब दारिद्र्यरेषेखाली राहणार नाही, यासाठी मी प्रयत्नशील आहे. यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोेगतांतून मळगावच्या विकासकामांसंबंधी व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच ग्रामस्थांच्यावतीने केसरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी) पालकमंत्र्यांमुळे विकासात अग्रेसरमळगावचे सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर म्हणाले, मळगाव ग्रामसचिवालयासाठी एका तपाचा कालावधी जावा लागला. सुमारे १२ वर्षानंतर हे सचिवालय निर्माण होत आहे. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर १२ महिन्यांतच हे काम पूर्ण होत आहे. पालकमंत्र्यांचे मळगावकडे विशेष लक्ष असल्याने या गावात विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबविले जात आहेत. रेल्वे टर्मिनस असो किंवा अन्य सुविधा, विकासकामांत गाव कायमच अग्रेसर राहिले आहे. ही बाब गावासाठी गौरवास्पद आहे. गावाच्या विकासाला सर्व ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा मोलाचा हातभार आहे, असे पेडणेकर म्हणाले.
सिंधुदुर्गला देशात श्रीमंत बनविणार
By admin | Published: October 13, 2016 9:25 PM