वेंगुर्ले : डेरवण येथे झालेल्या डेरवण युथ गेममध्ये सिंधुदुर्गच्या खेळाडूंनी बाजी मारली. यात सिंधुदुर्गचे अनेक खेळाडू चमकले आहेत.२६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत डेरवण येथे डेरवण युथ गेम अॅथलॅटिक्स स्पर्धा पार पडली. सिंधुदुर्गच्या चैताली विश्वास पवार हिच्या नेतृत्वाखाली संघाने ४ बाय १०० रिले प्रकारात तिसरा क्रमांक संपादन करुन जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर चमकविले.१८ वर्षे गटात चैताली पवार-४०० मीटर धावणे चौथा क्रमांक तसेच ३००० मीटरमध्ये आठवा क्रमांक, ईशा गोविंद बागवे-१५०० मीटर धावणे सातवा क्रमांक, लांब उडीमध्ये सहावा, निकिता निनावे-१५०० मीटर धावणे सहावा, लांब उडीत चौथा क्रमांक, १६ वर्षे गटात हिना गोविंद बागवे-४०० मीटर धावणे पाचवा, लांबउडीत चौथा क्रमांक, १४ वर्षे गटात दत्तप्रसाद परशुराम गोरल-२०० मीटर धावणेमध्ये पाचवा, समीर वड्डर-उंचउडी सहावा क्रमांक, १२ वर्षे गटात तन्वी शशिकांत परब-२०० मीटर धावणेमध्ये चौथा क्रमांक मिळाला.खेळाडूंना बाबली वायंगणकर व नगराध्यक्ष राजन गिरप यांचे सहकार्य लाभले. शिक्षक जयराम वायंगणकर, जयवंत चुडनाईक, संजीवनी परब तसेच समीर राऊत, विश्वास पवार, शशिकांत परब, गोविंद बागवे, यांचे मार्गदर्शन लाभले.