अनंत जाधव, सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. मात्र या ठिकाणी स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. ते कमी करण्याचे काम रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विशाल परब यांनी केले. त्यांनी असेच काम करावे या जिल्ह्यातून रोजगार देणारे हात निर्माण व्हावेत अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केले.
विशाल परब यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले “जॉब फेअर” रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, राज्य उपाध्यक्ष विशाल परब, लखमराजे भोसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, जावेद खतीब, अजय गोंदावळे, प्रथमेश तेली, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, रणजित देसाई, प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, दादा साईल, रवी मडगावकर, प्रायास भोसले, तेजस माने, प्रशांत पाटील भाई सावंत, संदीप मेस्त्री, युवा हबचे दिपक पवार, किरण रहाणे आदी उपस्थित आहेत.
मंत्री चव्हाण म्हणाले, या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा ही कौतुकास्पद बाब आहे. अनेक जण आश्वासन देतात परंतु परब यांनी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष अनेक उमेदवारांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे याचा फायदा युवा पिढीला होणार आहे.
भाजपच्या माध्यमातून वेळोवेळी अशा प्रकारचे समाजाभिमुख उपक्रम विविध राबविण्यात आले. यापुढेही ते राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य निश्चितच केले जाईल, मात्र या ठिकाणी आलेल्या उमेदवारांनी फक्त नोकऱ्या न शोधता आपण नोकरी देणारे बनवा. त्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य भाजपच्या माध्यमातून निश्चितच केले, जाईल असे ही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
उद्योजक विशाल परब म्हणाले,रोजगार मेळाव्यात आलेला प्रत्येक उमेदवार खुश होईल व आनंदाने घरी जाईल या दृष्टीने या ठिकाणी नोकऱ्या देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गेले अनेक दिवस अथक परिश्रम केले. आजची गर्दी पाहून त्या कामाचे चीज झाल्याचे दिसले, असे परब यांनी सांगितले.
पक्षाने कोणतीही जबाबदारी टाकल्यास आपण निश्चितच ती पूर्ण करू या ठिकाणी भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील असेही ते म्हणाले.यावेळी माजी आमदार राजन तेली यांनीही आपले विचार मांडले.या रोजगार मेळाव्यात मोठ्याप्रमाणात तरूण तरूणी सहभागी झाल्या होत्या तसेच विविध क्षेत्रातील दिडशे कंपन्यांचे अधिकारी कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.