ठळक मुद्देसंचारबंदीत मोचेमाड येथे १३ मच्छिमार अडकले १३ जणांना पुरेल एवढे अन्यधान्य
वेंगुर्ला : सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी तथा वेंगुर्ला तालुक्याचे परवाना अधिकारी सी.एम.जोशी यांच्या किनारपट्टीवरील सर्वेक्षणात असे दिसून आले की वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड समुद्रकिनारी कर्नाटक राज्यातून मासेमारीसाठी १३ जण आले आहेत व संचारबंदी असल्याने त्यांना गावी जाता येत नाही. मच्छिमारी बंद असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अशावेळी मंडल अधिकारी व्ही.जी.जाधव व मोचेमाड तलाठी सी. नागराज व सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी सी.एस.जोशी यांनी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या ही बाब निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन भाजपाच्यावतीने त्या १३ जणांना पुरेल एवढे अन्यधान्य त्या अधिकाऱ्यांबरोबर पाठविले.