शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

सहा लाखांची दारु जप्त, दोघांना अटक : वैभववाडीजवळील करुळ नाक्यावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 3:12 PM

गोव्याहून कोल्हापूरमार्गे मुंबईकडे निघालेल्या व्होल्वो बसमध्ये ६ लाख ४ हजार ५८४ रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु आढळली. या प्रकरणी पोलिसांनी दोन चालकांसह दारु व बस ताब्यात घेतली आहे. न्यायालयाने त्यांची १५ हजारांच्या जामिनावर सुटका केली. निवडणूक पथक आणि पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास करुळ तपासणी नाक्यावर ही कारवाई केली. विधानसभा आचारसंहिता लागल्यानंतरची तालुक्यातील ही पहिलीच कारवाई आहे.

ठळक मुद्देसहा लाखांची दारु जप्त, दोघांना अटक वैभववाडीजवळील करुळ नाक्यावरील घटना

वैभववाडी : गोव्याहून कोल्हापूरमार्गे मुंबईकडे निघालेल्या व्होल्वो बसमध्ये ६ लाख ४ हजार ५८४ रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु आढळली. या प्रकरणी पोलिसांनी दोन चालकांसह दारु व बस ताब्यात घेतली आहे. न्यायालयाने त्यांची १५ हजारांच्या जामिनावर सुटका केली. निवडणूक पथक आणि पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास करुळ तपासणी नाक्यावर ही कारवाई केली. विधानसभा आचारसंहिता लागल्यानंतरची तालुक्यातील ही पहिलीच कारवाई आहे.बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी पोलिसांनी बस चालक अफजल हुसेन सय्यद (४३, रा. सातारा, महाबळेश्वर), व शमशाद इद्रीश खान (४८, रा.ताडदेव, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर करुळ तपासणी नाक्यावर निवडणूक विभागामार्फत नेमलेल्या विशेष पथकामार्फत वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

गुरुवारी रात्री पोलीस नाईक कृष्णांत पाटील, पोलीस नाईक रवींद्र देवरुखकर, सर्वेक्षण पथकाचे अमोल पाटेकर, प्रकाश लांबोरे, संतोष साटम, अविनाश पाटील हे पथक तपासणी नाक्यावर होते. ते ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करीत होते.मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका कंपनीची ह्यव्होल्वोह्ण बस (क्रमांक- एआर-११; ए-७५६७) ही नाक्यावर आली. तपासणी करणाऱ्या पोलिसांनी बस चालक अफजल हुसेन सय्यद याला बसमधील प्रवासी सामान ठेवण्याची जागा उघडून दाखविण्यास सांगितले. त्यानुसार सय्यद याने सामान ठेवण्याचा कप्पा उघडला असता त्यामध्ये खोके असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

चालकाकडे पोलिसांनी त्याबाबत चौकशी केली असता त्याने बाथरुम क्लिनर असल्याचे सांगितले. तरीही पोलिसांनी एक खोका उघडून पाहिला तेव्हा त्या खोक्यामध्ये दारुच्या बाटल्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी ६ लाख ४ हजार ५८४ रुपये किमंतीची दारु आणि १४ लाख रुपये किंमतीची ह्यव्होल्वोह्ण बस असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी मुद्देमालासह दोघांना पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करीत दोघांनाही अटक केली. त्यांना सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर प्रत्येकी १५ हजारांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग