शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

धनादेश अनादरप्रकरणी सहा महिने कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 3:40 PM

धनादेश अनादर प्रकरणी तळवडे येथील अमोल रमेश गावडे (२८) याला वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीश वि. द. पाटील यांनी सहा महिने कारावास, ५ हजार रुपये दंड तसेच तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी २ लाख ७० हजार रुपये देण्याची शिक्षा ठोठावली आहे.

ठळक मुद्देधनादेश अनादरप्रकरणी सहा महिने कारावासवेंगुर्ला न्यायालयाने दिली शिक्षा

वेंगुर्ला : धनादेश अनादर प्रकरणी तळवडे येथील अमोल रमेश गावडे (२८) याला वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीश वि. द. पाटील यांनी सहा महिने कारावास, ५ हजार रुपये दंड तसेच तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी २ लाख ७० हजार रुपये देण्याची शिक्षा ठोठावली आहे.अमोल गावडे याने तक्रारदार भगवान सुधाकर तांडेल यांना तळवडे येथे दहा गुंठे जमीन खरेदी करून देतो असे सांगून त्यांच्यासोबत जमिनीसंदर्भात करार केला होता. तसेच तांडेल यांच्याकडून जमीन खरेदी करून देण्याच्या मोबदल्यात आगावू पैसेदेखील घेतले होते.

परंतु पैसे देऊनही तो जमीन खरेदी करून देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे तांडेल यांनी आपली रक्कम परत मागितली असता गावडे याने २४ सप्टेंबर २०१५ रोजी दोन लाखांचा धनादेश वितरीत केला होता.हा धनादेश तांडेल यांनी आपल्या बँकेत सादर केला असता गावडे याच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्यामुळे धनादेश अनादरीत झाला होता. याबाबत तांडेल यांनी वेंगुर्ला न्यायालयात गावडे याच्या विरुध्द फौजदारी केस दाखल केली होती व त्याबाबतचे सबळ पुरावे न्यायालयात दाखल केले हाते.तक्रारदार पक्षाच्यावतीने वकिलांनी सादर केलेले पुरावे व तांडेल यांची मांडलेली बाजू ग्राह्य धरून वेंगुर्ला न्यायालयाने सबळ पुराव्याअंती आरोपी अमोल गावडे याला सहा महिन्यांचा कारावास, ५ हजार रुपये दंड व तांडेल यांना नुकसान भरपाईपोटी २ लाख ७० हजार रुपये देण्याची शिक्षा दिली आहे. या प्रकरणी तांडेल यांच्यावतीने अ‍ॅड. बापू गव्हाणकर व अ‍ॅड. मनीष सातार्डेकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयsindhudurgसिंधुदुर्ग