शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

जिल्ह्यातील सहा तहसीलदारांना शासकीय गाडीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 3:19 PM

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये एकूण ८ तालुके असून त्यापैकी वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कुडाळ, देवगड, कणकवली या सहाही तहसिल कार्यालयांना ...

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये एकूण ८ तालुके असून त्यापैकी वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कुडाळ, देवगड, कणकवली या सहाही तहसिल कार्यालयांना शासकीय गाडी उपलब्ध नाही. त्यामुळे त्याचा परिणाम तालुक्याच्या शासकीय कामावर होत आहे. तरी शासनाने सहाही ठिकाणी तत्काळ शासकीय गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आधार फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आली आहे.फाऊंडेशनचे सचिव नंदन वेंगुर्लेकर, वेंगुर्लेचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, सुरेश भोसले, कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष अतुल बंगे तसेच योगेश तेली यांनी निवासी उपजिल्हाधकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडे याबाबत लेखी निवेदनाद्वारे दिले आहे.८ तालुक्यापैकी एकाच तालुक्याच्या तहसिलदारांना शासकीय गाडी सदयस्थितीत उपलब्ध आहे. परंतू उर्वरीत वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कुडाळ, देवगड, कणकवली या सहाही तहसिल कार्यालयांना शासकीय गाडी उपलब्ध नसल्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. तहसिलदार, वैभववाडी यांच्याकडे जूनी गाडी उपलब्ध असून लवकरच ती गाडी निर्लेखित होणार आहे असे समजते. 

जिल्हयाच्या नियोजन विभागाकडे केंद्रसरकार तसेच राज्यसरकारकडून विकास कामासाठी मोठया प्रमाणात भरघोस निधी येत असून शासकीय कार्यालयांना सुध्दा मोठया प्रमाणात शासकीय निधी येत असतो. गेल्या ४-५ वर्षामध्ये जिल्हयातील सर्व तहसिलदारांनी सातत्याने वारंवार लेखी व तोंडी मागणी करून सुध्दा शासकीय गाडी न दिल्यामुळे असंतोषाचे वातावरण आहे. आणीबाणीच्या काळात तसेच सध्याच्या आपत्कालीन प्रसंगाना तोंड देण्यासाठी २४ तास शासकीय गाडी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना अत्यावश्यक असतानाही या सुविधेपासून वंचित तहसीलदारांना तात्काळ शासकीय गाडी मिळावी यासाठी वेंगुर्ले मधील जागरूक नागरिकांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग