शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

हळव्या भाताचा हळुवार दिलासा

By admin | Published: September 05, 2015 11:52 PM

पाऊस नाही तरीही... : भात पसवण्यास प्रारंभ, शेतकऱ्यांना आशेचा किरण

रत्नागिरी : ऊन्हामुळे हळवे भात पसविण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावण्यात येते. हळवे, निमगरवे, गरवे प्रकारचे भात लावण्यात येते. निमगरवे, गरव्या प्रकारचे भात तयार होण्यास अजून विलंब असला तरी हळवे भात पसवण्यास प्रारंभ झाला आहे. सुरूवातीला पाऊस चांगला झाल्यामुळे पेरण्या लवकर पूर्ण झाल्या होत्या. मात्र, नंतर पावसाची हजेरी टप्याटप्याने झाल्यामुळे भात लागवड प्रक्रिया रेंगाळली. जुलै अखेरीपर्यंत भात लागवड सुरू होती. शेतकऱ्यांनी पंपाच्या, पाटाच्या पाण्यावर भात लागवड पूर्ण केली होती. मात्र भाताच्या खाचरात पाणी नसल्यामुळे लागवड झालेल्या भाताला फुटवे कमी फुटले. पाण्याअभावी भातपीक तयार होण्याची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. काही ठिकाणी तर भातावर करपा रोग पडला, शिवाय वाढ खुंटली. त्याचप्रमाणे खोडकिडा, निळे भुंगेरे, काटेरी भुंगेरेचा प्रादुर्भाव वाढला. वेळोवेळी किटकनाशकांची फवारणी करून रोग नियंत्रणात आणण्यात आले. हळव्या जातीचे भात पसविणे सुरू झाले आहे. त्यामुळे अधूनमधून पावसाची सर आवश्यक आहे. निमगरव्या व गरव्या जातीच्या भातासाठी देखील पाऊस आवश्यक आहे. गेले चार दिवस पुन्हा एकदा पावसाने उसंत घेतली आहे. साधारणत: सप्टेंबरपर्यंत पाऊस लागतो. त्यानंतर पाऊस निरोप घेत असल्यामुळे भात पिकाची उत्पादकता घटण्याचा धोका आहे. पावसाअभावी २५ ते ३५ टक्केनी भात उत्पादकता घटणार असल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे. भात खाचरे कोरडी असल्यामुळे भात वाढीवर त्याचा परिणाम झाला आहे. भाताबरोबर नागली तसेच इतर तृणधान्य, कडधान्य, वेलवर्गिय भाज्या यांच्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. कडक ऊन्हामुळे रोपे वाळू लागली आहेत. भात पसविताना जास्त पावसाची गरज आहे. गणेशोत्सवात पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळतो. त्यामुळे पसविलेल्या भाताला जास्त पावसाचा धोका संभवू शकतो. प्रमाणापेक्षा पाऊस जास्त झाल्यास नुकसानही संभावते. (प्रतिनिधी)