शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

शेतकऱ्यांना मिळणार मृद् आरोग्य कार्ड

By admin | Published: April 29, 2015 10:06 PM

मृद् आरोग्य पत्रिका अभियान : मातीलाही द्यावी लागणार आता सुपिकतेची परीक्षा

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी --शेतकऱ्यांच्या शेतातील मातीपरीक्षण करुन त्याला आवश्यक ती खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपिकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. पिकांना आवश्यक असलेल्या अन्न द्रव्यांचा समतोलपणा टिकून रहाण्यास मदत होते. यासाठी महाराष्ट्र शासनाने मृद् आरोग्य पत्रिका अभियान राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार माती परीक्षण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मृद् आरोग्य कार्ड देण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील १५२५ गावातील शेतकऱ्यांच्या मातीची तपासणी केली जाणार आहे. १० हेक्टरला एक गट नमुन्याप्रमाणे ४० हजार नमुन्यांची तपासणी तीन वर्षात पूर्ण केली जाणार आहे. वर्षाला ५०० गावांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शासकीय प्रयोगशाळेत ७ हजार ६०० नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे तर उर्वरित नमुने खासगी प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत. दापोली, अर्बन बँक, सायन्स कॉलेज, दापोली, डीबीजे महाविद्यालय, चिपळूण, कृ षी विज्ञान केंद्र देवधे, अ‍ॅग्रीकल्चर कॉलेज मांडकी, खरवते दहिवली कृषी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासण्या केल्या जाणार आहेत.शासनाकडून मृद् आरोग्य तपासणी विनामूल्य करण्यात येणार असून २०१५ ते २०१८ पर्यंत तपासणी पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र तपासणी कार्ड वितरण केले जाणार आहे.जमिनीतील उपलब्ध घटकांचे प्रमाण तसेच दोष, जमिनीच्या प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन, जमिन सुधारण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना, खतांची संतुलीत मात्रा, संतुलीत खताचा पुरवठा झाल्याने उत्पादन क्षमता टिकून रहाते. या बाबींची पुर्तता माती परीक्षणामुळे होत असल्याने शेतकरी परीक्षण अहवाल प्रयोगशाळेतून स्वतंत्ररित्या मिळविण्याचा प्रयत्न आजपर्यंत करीत होते. परंतु आता हे परीक्षण शासनाकडून विनामुल्य होणार असल्याने शेतकरी वर्गाला आपल्या जमिनीची पोत, सुपिकता, उत्पादनक्षमता कळून येण्यास मदत होणार आहे.जिल्ह्याचे मुख्य पिक भात असून ७० हजार १९३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. दरवर्षी जिल्ह्यात सुमारे १ लाख ९६ हजार ५४०.४ मेट्रिक टन भाताचे उत्पादन होते़ नागली पिक दुय्यम पिक घेतले जाते. नागलीची लागवड १५ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर करण्यात येते. इतर तृणधान्य १८३० हेक्टर, उडीद १८८ हेक्टर, तूर २८० हेक्टर, कडधान्यांमध्ये मूग १४ हेक्टर, भुईमूग ९ हेक्टर, तीळ ४१ हेक्टर, कारळा ६२८ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. कोकणच्या अर्थव्यवस्थेत आंबा पिकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम विद्यापिठाने दिलेल्या सल्यानुसार दहा वर्षाचे आंब्याच्या झाड लावलेल्या मातीमध्ये १३८० ग्रॅम नत्र, ४८० ग्रॅम स्पुरद, ११६० ग्रॅम पालाशचे प्रमाण असणे आवश्यक आहे. तर भात लावलेल्या मातीमध्ये १०० किलो नत्र, ५० किलो स्पुरत, ५० किलो पालाश असणे आवश्यक आहे.उपयुक्त अभियानमातीतील घटकांचे प्रमाण कमी आढळल्यास त्याप्रमाणे खताचे डोस वाढविण्याचा सल्ला देण्यात येत असल्याने जमिनीची उत्पादकता वाढविणे, किंवा पोत सुधारण्यासाठी अभियान उपयुक्त ठरणार आहे.1अभियानातंर्गत जमिनीच्या सर्वसाधारण तपासणीमध्ये सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फुरद, पालाश तपासणी केली जाणार आहे.2सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फुरद, पालाश, सोडीयम, कॅल्शियम, मेग्नेशिअम, मुक्त चुना, जलधारणा, माती घनता, पोत तपासली जाणार आहे. 3सूक्ष्म मुलद्रव्ये मृद नमुन्यांतर्गत मातीमधील तांबे, जस्त, लोह, मंगल याचीही स्वतंत्रपणे तपासणी केली जाणार आहे.