कणकवली : सिंधुदुर्गातील शेतकरी ऊस शेती, फळ बागायती व अन्य प्रकारची शेती करीत आहेत. शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पादन वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़ कुठलीही शेती करीत असताना माती परीक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे स्वामी लॅब सोल्युशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माती परीक्षणाची सेवा मिळणार आहे. या माती परीक्षणामुळे शेतक-यांच्या उत्पादनात वाढ होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केले.
जानवली आदर्शनगर येथील स्वामी लॅब सोल्युशनचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते पार पडले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर, कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष हेमंत सावंत, ज्येष्ठ नागरिक संघाचे रवींद्र मुसळे, अप्पीशेठ गवाणकर, प्रा. डॉ़ गुरूदेव परुळेकर, डॉ. रिझवान पिंजारी, चेतन प्रभू, जानवली सरपंच राणे आदी उपस्थित होते.
यावेळी संजना सावंत म्हणाल्या, प्रगतशील शेतकरी घडविताना माती, पाणी आणि पाने परीक्षण प्रयोगशाळा शेतकºयांसाठी दिशादर्शक ठरेल़ या स्वामी लॅब सोल्युशनमधून शेतक-यांना असलेली गरज भागणार आहे़ मानवी जीवनाला जशी आरोग्य राखण्याची गरज आहे़ त्याचप्रमाणे धरणी मातेचे आरोग्य राखण्याचे आपल्या सर्व लोकांची जबाबदारी आहे़ मातीचे परीक्षण केल्यानंतर भविष्यात पिकावर येणाºया मर्यादा लक्षात येतील़ त्यामुळे शेतकºयांचे होणारे नुकसान थांबेल़ अत्याधुनिक साधन सामुग्रीच्या माध्यमातून चेतन प्रभू शेतकºयांना चांगली सेवा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शेतक-यांना दिशादर्शक!चेतन प्रभू म्हणाले, सिंधुदुर्गात पहिल्यांदाच स्वामी लॅब शेतकºयांच्या सेवेसाठी दाखल होत आहे़ प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतकºयांच्या हितासाठी दिशादर्शक मार्ग मिळेल़ आधुनिक शेतीच्या प्रयोगामध्ये शेतकºयांना स्वामी लॅबच्या माध्यमातून चांगली सेवा दिली जाईल़ फळबागा व इतर शेतीचे उत्पादन वाढीसाठी मदत होईल़ शेतकरी माती परीक्षणामुळे होणाºया नुकसानीच्या संकटातून बाहेर येईल़ सेंद्रिय खत व इतर घटकांचाही परिणाम काय असतो याची माहितीही दिली जाणार आहे़