सावंतवाडी : लोकमत सिंधुदुर्ग आवृत्तीच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त खास आयोजित करण्यात आलेल्या सोलो व गु्रप डान्स स्पर्धेची प्राथमिक फेरी गुरूवारी पार पडली. यात गु्रपडान्समध्ये ४२ संघांनी तर सोलो डान्स प्रकारात ५४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यातील ३५ स्पर्धकांची २१ फेबु्रवारी रोजी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. यात गु्रप डान्ससाठी १५ संघ तर सोलो डान्सकरिता २० जणांची निवड करण्यात आली आहे.लोकमत सिंधुदुर्ग आवृत्तीच्या ८ व्या वर्धापन दिनाानिमित्त सोलो व गु्रप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याची प्राथमिक फेरी येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी या प्राथमिक फेरीत सहभाग नोंदवला. यासाठी एकूण ९६ स्पर्धक आले होते. यात ४२ संघांनी ग्रुप डान्समध्ये तर ५४ स्पर्धकांनी सोलो स्पर्धेत सहभाग घेतला होता.स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद बघून 'लोकमत'ने या स्पर्धेकांचे चार गटात विभाजन केले आहे. यामध्ये ग्रुप डान्स व सोलो डान्स मध्ये लहान व मोठा गट असे दोन गट करण्यात आले आहेत. लहान व मोठ्या गटात ज्या स्पर्धकांची निवड झाली आहे. त्यांची यादी खालीलप्रमाणे आहेग्रुप डान्स (खुला गट ) - सेंट्रल इंग्लिश स्कूल (पणती ग्रुप, सावंतवाडी), आरडीएक्स ग्रुप (सावंतवाडी), डीएड कॉलेज ग्रुप (कणकवली), एस. आर. गु्रप (सावंतवाडी), सेंट्रल इंग्लिश स्कूल (एम. जी. फायर, सावंतवाडी), जिल्हा परिषद शाळा क्र. ७ (सावंतवाडी), गवाणकर कॉलेज (सावंतवाडी), डिसकॉड ग्रुप (सावंतवाडी), जिल्हा परिषद शाळा क्र. १ (कास), ओंकार गु्रप (सावंतवाडी), जवाहर नवोदय विद्यालय, (सांगेली), सांगेली सावरवाड शाळा (सांगेली). ग्रुप डान्स (लहान गट) शाळा नं. २ अंगणवाडी (सावंतवाडी), शारदा मंदिर - वंदे मातरम् (सावंतवाडी), श्री कला अकादमी (सावंतवाडी), उर्मी ग्रुप (सावंतवाडी).सोलो डान्स ( मोठा गट ) तन्वी देसाई (सावंतवाडी), मृणाल सावंत (कुडाळ), खुशी पवार (सावंतवाडी), अनुष्का ठाकूर (कडावल), गौरेश राऊळ (वेर्ले), खुशी वारंग (सावंतवाडी), विद्या मादाकासे (सावंतवाडी), शिवानी शिंदे (सावंतवाडी), भक्ती जामसंडेकर (सावंतवाडी), कृतिका यादव (सावंतवाडी), प्रतीक्षा सावंत (सावंतवाडी), पूजा राणे (सावंतवाडी), अनिकेत आसोलकर (सावंतवाडी). सोलो डान्स ( छोटा गट ) जॉय डॉन्टस (सावंतवाडी), कनिष्क दळवी (सावंतवाडी), स्टेला डॉन्टस (सावंतवाडी), वैष्णवी गावडे (सावंतवाडी), साक्षी शेवाळे (सावंतवाडी), प्रार्थना मातोंडकर (सावंतवाडी) अशी निवड झालेल्या स्पर्धकांची नावे आहेत. या स्पर्धकांनी अंतिम फेरीसाठी २१ फेबु्रवारीला सायंकाळी ४ वाजता बॅ. नाथ पै सभागृहात हजर राहणे गरजेचे आहे. स्पर्धकांनी आपली तयारी परिपूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सोलो व गु्रप डान्स स्पर्धा या सिंधुदुर्गवासीयांना मोफत बघण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुरूवारी पार पडलेल्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून साक्षी वंजारी, प्रतिभा चव्हाण व प्रसन्न कोदे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
सोलो, ग्रुप डान्सला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: February 19, 2015 10:38 PM