दोडामार्ग : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, शुक्रवारी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी तालुक्याच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या चारही तपासणी नाक्यांची पाहणी करून त्याबाबतचा आढावा घेतला.सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कर्नाटक राज्याला लागूनच महाराष्ट्राची आणि पर्यायाने दोडामार्ग तालुक्याची सीमा आहे. त्यामुळे कर्नाटकात अवैध मार्गाने दारू तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी रोकड अथवा अन्य साहित्याची वाहतूक होऊ शकते. त्यामुळे अशी वाहतूक होऊ नये यासाठी सीमावर्ती भागातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर तपासणी नाके उभारून ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस प्रशासनास देण्यात आले होते. त्या अनुषंगाने तालुक्यात खोक्रल, वीजघर, दोडामार्ग, आयी अशा चार ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्याला भेट दिली. सर्व तपासणी नाक्यांची पाहणी करून पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांची दोडामार्गाला भेट, तपासणी नाक्याची केली पाहणी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 28, 2023 5:10 PM