शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

कोकण रेल्वेची गती झाली धीमी, पावसाळी वेळापत्रक लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 4:23 PM

कोकण रेल्वेकडून सुरक्षिततेचा उपाय म्हणून पावसाळय़ात दरवर्षी स्वतंत्र वेळापत्रक लागू केले जाते. त्यानुसार कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १० जूनपासून अंमलात आले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची गती काहीशी धीमी झाली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे वेळापत्रक लागू राहणार आहे.

ठळक मुद्देकोकण रेल्वेची गती झाली धीमी, पावसाळी वेळापत्रक लागूकाही गाड्यांच्या वेळात बदल

कणकवली : कोकण रेल्वेकडून सुरक्षिततेचा उपाय म्हणून पावसाळय़ात दरवर्षी स्वतंत्र वेळापत्रक लागू केले जाते. त्यानुसार कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १० जूनपासून अंमलात आले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची गती काहीशी धीमी झाली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे वेळापत्रक लागू राहणार आहे.पावसाळी वेळापत्रकाच्या कालावधीत कोकण मार्गावर रेल्वेचा वीर ते कणकवली पर्यंतचा वेग ताशी ११० ऐवजी ताशी ७५ राहणार आहे. अतिवृष्टी झाल्यास हा वेग ताशी ४० ठेवण्याच्या सूचना रेल्वे प्रशासना मार्फत करण्यात आल्या आहेत.अतिवृष्टीदरम्यान निर्माण होणाऱ्या अडथळय़ांवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजनावर भर देत ठोस उपाययोजनांचा अवलंब करण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण मार्गाची पाहणी करत आढावा घेतला.

अतिवृष्टीदरम्यान गस्तीसाठी ६३० रेल्वे कर्मचाऱ्यांची जादा कुमकही तैनात करण्यात येणार आहे. पावसाळा संपेपर्यंत २४ तास नियंत्रण कक्षही उभारण्यात येणार असून २४ तास गस्त सुरू राहणार आहे.कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाडय़ांच्या वेगावर मर्यादा घालण्यात येणार आहेत. रोहापासून ठोकूरपर्यंत ताशी ७५ च्या वेगाने रेल्वेगाडय़ा धावणार आहेत. वीर ते कणकवली ताशी ७५ , कणकवली ते मडगाव ताशी ९०, मडगाव ते कुमठा ताशी ७५, कुमठय़ापासून उडपीपर्यंत ताशी ९० वेग राहणार आहे. तसेच मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास गाडय़ांचा वेग ताशी ४० राहणार असल्याने प्रवाशांचा प्रवास आणखी लांबणीवर पडणार आहे.मुंबईहून कोकणात येणाऱ्या गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, वेग मंदावल्याने गाड्या कोकणात उशिराने पोहचणार आहेत.मुंबईकडे जाणाऱ्या काही महत्वाच्या गाड्यांच्या सिंधुदुर्गातील काही स्थानकावरील बदललेल्या वेळा पुढील प्रमाणे आहेत. जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०५२ ) कुडाळ दुपारी १.४८, कणकवली २.२२ वाजता. कोकणकन्या (१०११२) सावंतवाडी सायं. ६.११, कुडाळ ६.३७, कणकवली ७.१३दीवा पॅसेंजर (५०१०५) सावंतवाडी सकाळी ८.३०, कुडाळ ८.५२, कणकवली ९.१९.मंगला एक्स्प्रेस (१२६१७) कणकवली सकाळी ३.३२ वाजता. मंगलोर एक्स्प्रेस (१२१३४) कणकवली रात्री ११.५६ वाजता. मांडवी (१०१०४) सावंतवाडी सकाळी १०.१०, कुडाळ सकाळी १०.२८ , कणकवली ११ वाजता. तुतारी (११००४) सावंतवाडी सायंकाळी ५.३०, कुडाळ सायंकाळी ५.४८, कणकवली सायंकाळी ६.२६ वाजता.मत्स्यगंधा (१२६२०) कुडाळ रात्री ८.५२ वाजता. नेत्रावती (१६३४६) कुडाळ सकाळी ७.५४. डबलडेकर (११०८६) (मंगळ, गुरू ) सावंतवाडी सकाळी ६.५४, कणकवली सकाळी ७.४४ वाजता.डबलडेकर (१११००) रविवारी सावंतवाडी दुपारी १.०२, कणकवली दुपारी २ वाजता.तिरुनवेली दादर (२२६३०) गुरुवारी कणकवली सकाळी ६.४० वाजता. ओखा (१६३३६)( गुरु, शनी )- कणकवली दुपारी १२.०८ वाजता.करमळी - एलटीटी (२२११६) (गुरु), कुडाळ दुपारी २.१२, कणकवली दुपारी २.४२ वाजता.एर्नाकुलम पुणे (२२१४९) (मंगळ, शुक्र) सावंतवाडी रात्री ८.२०, कणकवली रात्री ९.५ वाजता. तेजस (२२१२०) (बुध,शुक्र,रवी) कुडाळ दुपारी १२.५४. गरीबरथ एलटीटी (१२२०२) (शुक्र,सोम), सावंतवाडी पहाटे ३.४० वाजता. कोचुवेली एलटीटी (२२११४) (मंगळ, शुक्र), कुडाळ रात्री ९.२८वाजता. अशा रेल्वेच्या नवीन वेळा आहेत.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग