रत्नागिरी : महासोमसागानंतर पुणे येथील नादब्रह्म संस्थेतर्फे नाट्यरंग कार्यक्रम सादर करण्यात आला. पं. बकुळ पंडित, पं. अरविंंद पिळगावकर, डॉ. वंदना घांगुर्डे, डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी एकापेक्षा एक सुरेख नाट्यगीते सादर केली. नाट्यअभिनेत्री, गायिका रजनी जोशी यांनी निवेदन केले. नमन नटवरा या नांदीने वातावरण भारले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या स्वयंवर नाटकाचे १६ मार्चपासून शताब्दी वर्ष सुरू होत आहे. शताब्दीङ्कमध्येही या नाटकातील ‘हे प्रभो विभोमही’, नांदी सादर करण्यात आली. यानंतर डॉ. वंदना घांगुर्डे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत काका नारायणराव पटवर्धनांच्या घरी राहायला होते. स्वा. सावरकरांनी या घरामध्ये उ:शाप, सन्यस्तखडग आदी नाटके लिहिली.त्यावेळी ङ्कमास्टर दिनानाथांची बलवंत संगीत मंडळी नाट्य दौऱ्यावर असताना याच घरात मुक्कामास होती. मास्टरजी आणि सावरकरांची भेट झाली आणि त्यांचे संगीत व तात्यारावांच्या लेखणीतून सन्यस्तखडग गाजले. पुरुषोत्तम खुल्या रंगमंचावर ‘कट्यार काळजात घुसली’ पाहिले आणि वसंतराव देशपांडेंच्या गायन, आवाजाने प्रभावित होऊन ‘करीन तर गाणेच’ असा निश्चय केल्याचे वंदनातार्इंनी सांगितले. वडील मधुभाऊंकडे अग्निहोत्र परंपरा असली तरी मी स्वरयज्ञात आहुती देत आहे, असे सांगून त्यांनी ‘मम आत्मा गमला’ व नंतर ‘सन्यस्तखडग’मधील ‘शतजन्म शोधिताना’ हे पद सादर केले.त्यानंतर पं. पिळगावकर यांनी संत कान्होपात्रा नाटकातील जोहार मायबाप हे पद ऐकवले. चंद्रिका ही जणू या गीताला टाळ्यांचा कडकडाट मिळाला. पं. बकुळ पंडित यांनी ‘उगवला चंद्र पुनवेचा’, व ‘का धरिला परदेस सजणा’ ही त्यांच्याच आवाजात लोकप्रिय झालेली गीते ऐकविली. विलोपले मधु मिलनात व अन्य गीते डॉ. घांगुर्डे यांनी सादर केली.या कलाकारांना माधव मोडक यांनी तबलासाथ, चैतन्य पटवर्धन यांनी हार्मोनियम आणि अविनाश लघाटे यांनी व्हायोलिनसाथ केली. (प्रतिनिधी)
नाट्यरंग कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: January 19, 2015 11:02 PM