शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

भुईबावडा-रिंगेवाडी येथे एसटी बस कलंडली, चार प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:47 AM

बसमध्ये होते ६५ प्रवासी 

वैभववाडी : भुईबावडा रिंगेवाडी येथे समोरून येणाऱ्या ट्रकला बाजू देताना पुणे-पणजी ही एसटी बस उलटली. यात चार प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात मंगळवारी (दि.१७) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला. महिनाभरातील हा एसटीचा दुसरा अपघात आहे.जखमींमध्ये आनंदा बबन सोनुले (६६, वैभववाडी), सुजाता बाबू जाधव (४०, कासार्डे), पुष्पा नारायण कांबळे (५५, सैतवडे गगनबावडा), संतोष शंकर नेने(३४, कोकिसरे) यांचा समावेश आहे.पुण्याहून पणजीला निघालेली एसटी बस (क्रमांक एमएच१४, केक्यू- ५९३७) भुईबावडा घाट उतरून वैभववाडीकडे येत होती. भुईबावडा रिंगेवाडी पुलानजीक बस आली असताना समोरून आलेल्या ट्रकला बाजू देण्यासाठी बस चालकाने वेग कमी करीत गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बाजूपट्टीवरून गाडी घसरत रस्त्याबाहेर जाऊन कलंडली.अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार सूर्यकांत पाटील हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. याशिवाय सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, हवालदार शैलेश काबंळे, हरेष जायभाय, अजय बिलपे, जितेंद्र कोलते आदी अपघातस्थळी दाखल झाले होते. अपघाताची माहिती मिळताच रिंगेवाडी पोलिस पाटील मनोज चव्हाण, मनोज गुरव, जितेंद्र चव्हाण, उमेश देसाई, महेंद्र देसाई या तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन अन्य वाहन चालक व पोलिसांच्या मदतीने सर्वांना सुखरूप बाहेर काढले.

एक गंभीर, तिघे किरकोळ जखमीबस कलंडताच बसमधील प्रवाशांनी एकच गोंधळ सुरू केला. बस वाहकाच्या बाजूवर कोसळल्यामुळे दरवाजा बंद झाला होता. त्यामुळे बसमधून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू होती. स्थानिक ग्रामस्थांनी आपत्कालीन खिडकीसह बसची पुढील काच फोडून बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. तसेच जखमींना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातvaibhavwadiवैभववाडी