देवगड (सिंधुदुर्ग) : भाजप प्रणीत सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या देवगड आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. जामसंडे येथील भाजप कार्यालयात उपस्थित राहून प्रवेश करण्यात आला.यावेळी माजी आमदार अजित गोगटे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी द्यावेत. ते नक्की सोडवू, असे सांगून लवकरच कर्मचाऱ्यांचा जिल्हा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नितेश राणे म्हणाले, ही संघटना सत्ताधारी पक्षाची आहे. केंद्रात व राज्यात आपला पक्ष असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ यांची देवगड आगारातील कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष विकास कोकम, उपाध्यक्ष पंकज राजम, एन. के. शेट्ये, सचिव साईनाथ ओटवकर, सहसचिव एन. एस. सावंत, एस. एस. साटम, खजिनदार - एस. आर. आचरेकर, संघटक - सचिव एन. एन. घाडी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य - व्ही. आर. सावंत, पी. डी. परब, आर. एम. मेस्त्री, सल्लगार- एस. व्ही. पाटील, एम. डी. जाधव, एल. एम. लाड, आर. जी. नारींग्रेकर, प्रसिद्धी प्रमुख प्रथमेश प्रदीप घाडी. देवगड आगारमध्ये या संघटनेचा फलक लावण्यात आला असून, फलकाचे अनावरण आमदार नितेश राणे यांनी केले.
देवगडमधील एसटी कर्मचारी भाजपाप्रणित सेवाशक्ती संघर्ष संघटनेत दाखल
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 02, 2023 6:18 PM