देवगड : देवगड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांबरोबरच प्रमुख राज्यमार्गांची अवस्था दयनीय झाली असून गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना आमदार नीतेश राणे यांनी देवगड तालुका शांतता समितीच्या बैठकीत बांधकाम विभागाला दिल्या आहेत.देवगड तालुका शांतता समितीची बैठक राणे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात झाली. या बैठकीला तहसिलदार मारूती कांबळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, नगराध्यक्षा प्रणाली माने तसेच विविध खात्याचे खातेप्रमुख उपस्थित होते. तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था व कोलमडलेली दूरसंचारची सेवा याबाबत आमदार राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.यावेळी गणेशविसर्जनस्थळी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तात्पूरते वीजकनेक्शन द्यावेत अशा सूचना राणे यांनी वीज वितरण विभागाला दिल्या. पोलिसांनी जामसंडे, शिरगाव, तळेबाजार या बाजारपेठांमध्ये उद्भवणाऱ्या वाहतुकीच्या समस्येबाबत योग्य नियोजन करावे. यावेळी विजयदूर्ग पोलिस ठाण्याचे प्रभारी संतोष कोळी यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा पोलिस कर्मचारी देण्यात येणार असून पोलिस गस्तही वाढविण्यात येणार आहे अशी माहिती दिली.तालुक्यातील रस्त्यांची अवस्था फार गंभीर असून विजयदूर्ग तळेरे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. चतुर्थीपूर्वी रस्त्यांची दुरूस्ती करावी. आपण स्वत: पाहणी करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी करा, शांतता समितीच्या बैठकीत आमदारांच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:33 AM
देवगड : देवगड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांबरोबरच प्रमुख राज्यमार्गांची अवस्था दयनीय झाली असून गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी ...
ठळक मुद्देगणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी कराशांतता समितीच्या बैठकीत आमदारांच्या सूचना