वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात भाजपचे सदस्य झालेल्या सात हजार सभासदांशी संपर्क साधून संवाद साधत केंद्र व राज्य सरकारचे निर्णय व योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या भाजपच्या महासंपर्क अभियानाचा शुभारंभ वेंगुर्ले तालुक्याच्या भाजपच्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी पार पडला. वेंगुर्ले येथील भाजपच्या तालुका कार्यालयात वेंगुर्ले तालुका भाजप संपर्क अभियान बैठक साईप्रसाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी तालुक्यात सदस्य झालेल्या सात हजार भाजप सदस्यांशी संपर्क साधून राज्य व केंद्रातील शासनाचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्याबाबत सूचना केल्या. बैठकीत त्याचे नियोजन केले. बैठकीस नगरसेविका अॅड. सुषमा प्रभूखानोलकर, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस दीपक माडकर, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, उपाध्यक्ष संदीप पाटील, दादा वाटवे, उपेंद्र वालावलकर, दाजी तांडेल, शहराध्यक्ष संजय तानावडे, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, अनंत नेरूरकर, रवींद्र शिरसाट, आप्पा ठाकूर, विनय गोगटे, दाजी धुरी, किरण तोरसकर, मंगेश परब, सोनू धुरी, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस विजय नाईक व भाई गिरकर यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्ददल श्रद्धांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)आंबा कोंडसकर यांचा सत्कारवेंगुर्ले तालुका ‘आत्मा’ या कृषी समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या आबा कोंडसकर यांचे तालुका पक्ष संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात आले. आत्माच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी कोंडसकर यांनी सांगितले. वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयातील डॉ. जाधव यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा वेंगुर्लेत आणावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
‘भाजप’च्या महासंपर्क अभियानास प्रारंभ
By admin | Published: June 08, 2015 9:35 PM