शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

तळेरेत संपर्क कार्यालयाचा प्रारंभ

By admin | Published: March 22, 2015 10:28 PM

कृती समितीचा पुढाकार : थाटात उद्घाटन; गावातील सूचना, पत्रव्यवहार होणार

नांदगांव : तळेरे येथील नियोजित तळेरे तालुका कृती समितीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी तळेरे येथील ज्येष्ठ नागरिक रमाकांत वरुणकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत नियोजित तळेरे तालुका कृती समितीची निवड करण्यात आली होती. तळेरे बाजारपेठेत प्रवीण वरुणकर यांच्या घरी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी तळेरे सरपंच दर्शना बांदिवडेकर, उपसरपंच शशांक तळेकर, निवृत्त पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर, कृती समिती अध्यक्ष बापू डंबे, कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड. प्रसाद करंदीकर, पोंभुर्ले सरपंच सादिक डोंगरकर, दत्तात्रय कल्याणकर, दिलीप तळेकर, राजू जठार, पोलीस पाटील चंद्रकांत चव्हाण, उदय दुधवडकर, प्रसाद कल्याणकर, उल्हास कल्याणकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, शरद वायंगणकर, प्रवीण वरुणकर, बी. पी. साळीस्तेकर, सतीश चेंदवणकर उपस्थित होते. नियोजित तळेरे तालुका होण्याबाबत आवश्यक ती माहिती अथवा नियोजित तळेरे तालुक्यामध्ये येणाऱ्या गावांबद्दल असणाऱ्या सूचना वपत्रव्यवहार या कार्यालयामार्फत होणार असून, बाजारात असल्यामुळे सर्वानाच सोयीचे होईल.तळेरे तालुका व्हावा अशी अनेक ग्रामीण भागातील ग्रामस्थांची मागणी असून, त्यासाठी विशेष प्रयत्न या समितीमार्फत करण्यात येणार आहेत. या कामासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय स्तरावरही विशेषत्वाने प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रयत्नांना अधिक बळकटी येण्यासाठी सध्याच्या अस्तित्वात असलेल्या कणकवली व देवगड तालुक्याच्या ठिकाणी जायला वेळ जातो. शिवाय आर्थिक, मानसिक मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अशा गावांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन नियोजित तळेरे तालुका कृती समितीच्यावतीने करण्यात आले.यावेळी मोहन भोगले, राजेश माळवदे, राजकुमार तळेकर, उद्योगपती शांतिनाथ लडगे, नरेश वरुणकर, नीलेश तळेकर, विश्वजित तळेकर, चंद्रकांत चव्हाण, मनोज तळेकर, विजय पावसकर, मारुती वळंजू, दादासाहेब महाडिक, उद्योगपती गोपाळ बांदिवडेकर, नामदेव पाताडे, डॉ. अभिनंदन मालंडकर, संतोष जठार, आप्पा मेस्त्री यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तळेरेसह इतर गावातील ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिकांनी तळेरे तालुका लवकरात लवकर व्हावा व ग्रामीण जनतेचे हाल कमी व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. (वार्ताहर)सूचनावहीत नोंद करावी याठिकाणी सूचनावही ठेवण्यात आली असून, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांनी नियोजित तळेरे तालुक्याबाबतच्या सूचना नोंद कराव्यात, असे आवाहन करण्यात आले. आवश्यक त्या सूचना विचारात घेतल्या जातील. तसेच तळेरे तालुक्याच्या दृष्टिकोनातून नवीन काही सुचवायचे असेल तरीदेखील त्याचे स्वागत केले जाईल असे कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले.