शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

गणेशोत्सवाला थाटात प्रारंभ

By admin | Published: September 06, 2016 1:42 AM

जिल्ह्यात भक्तिमय वातावरण : ६६ हजार ५३४ घरगुती तसेच ३७ सार्वजनिक गणरायांचे पूजन

कणकवली : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात सोमवारी सिंधुदुर्गात ६६ हजार ५४५ ठिकाणी घरगुती तर ३७ ठिकाणी सार्वजनिक मंडळांच्या गणरायाची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या आनंदोत्सवात लहान थोर दंग झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.सिंधुदुर्गसह कोकणात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी गेल्या एक महिन्याहून अधिक काळ सुरु होती. भाद्र्रपद महीना सुरु झाला आणि या तयारीने आणखीनच वेग घेतला होता. अखेर भाद्र्रपद शुध्द चतुर्थीला म्हणजेच सोमवारी गणरायाची भावपूर्ण वातावरणात अनेक घरात स्थापना करण्यात आली.गणेशचतुर्थीच्या दिवशी होणारी तारांबळ टाळण्यासाठी काही ठिकाणी रविवारीच श्री गणेश मूर्ती घरी आणून ठेवण्यात आली होती. तर काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात सोमवारी सकाळी गणरायाचे आगमन झाले. सकाळपासूनच गणरायाच्या पूजेसाठी अनेक घरात लहान थोर मंडळींची लगबग सुरु होती.श्री गणेश मूर्तींची स्थापना झाल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आरतीही करण्यात आली. उकडीच्या एकवीस मोदकांचा नैवेद्य गणरायाला अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण केला. तर सायंकाळी ही पुन्हा पूजन, आरती करण्याबरोबरच भजन तसेच अन्य धार्मिक विधि करण्याचा परिपाठ सुरु झाला आहे. तो श्री गणेश मूर्ती विसर्जनापर्यंत सुरु रहाणार आहे.प्रत्येक घरात पारंपरिक पध्दतीने तसेच प्रत्येकाच्या रुढीनुसार दीड, पाच, सात, नऊ, अकरा, सतरा, एकोणीस, एकवीस, बेचाळीस असा गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने सर्वत्र वातावरण भारावलेले राहणार आहे.त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. प्रशासन ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहे. (प्रतिनिधी)मृदंग, तबल्याच्या साथीने आरतीचे स्वर उमटले सोमवारी घरोघरी गणरायाचे विधिवत पूजन झाल्यानंतर परंपरेप्रमाणे आरती करण्यात आली. तर राजस सुकुमार अशा घरात विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन झाल्यानंतर अगदी आतुरतेने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची वाट पहाणाऱ्या लहान थोर मंडळींचा आनंद गगनात मावेनासा झाला.टाळ, ढोलकी, मृदंग, तबला , हार्मोनियम आदी वाद्यांच्या साथीने सर्वत्र सुमधुर आरतीचे स्वर गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक घरात उमटले. अनेक घरात पुरोहितांच्या उपस्थितीत श्री गणेश मूर्तीची स्थापना तसेच विधिवत पूजन करण्यात आले. अनेक ठिकाणी पुरोहिताना पुजेसाठी आमंत्रण देण्यात आलेले असल्याने यजमानांच्या घरी पूजनाची वेळ साधण्यासाठी सकाळपासूनच अनेक पुरोहितांची लगबग सुरु होती.