सिंधुदुर्ग : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झालेल्या तालुका निहाय गावांमध्ये युध्दपातळीवर कामे सुरू करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी घेतली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रशिक्षणार्थी आय. एस. करिष्मा नायर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत आदी उपस्थित होते.सर्व यंत्रणांच्या सहभागाने आणि समन्वयाने कामे सुरू करावीत असे सांगून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ग्रामपंचायत सेवाभावी संस्था, सामाजिक संस्थांचाही यात सहभाग घ्यावा. त्यासाठी बैठक आयोजित करावी. ही कामे सर्व यंत्रणांच्या समन्वयाने युध्दपातळीवर सुरु करावीत त्यासाठीचे तांत्रिक अंदाजपत्रकही तयार करावे, असेही त्या म्हणाल्या.
सिंधुदुर्गातील जलयुक्तची कामे युध्दपातळीवर सुरु करा, जिल्हाधिकाऱ्यांनी केली सूचना
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 07, 2023 5:49 PM