रत्नागिरी : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य संघ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला दि. १७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी दादा लोगडे यांच्या हस्ते प्राथमिक फेरीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे होणाऱ्या प्राथमिक फेरीतील शुभारंभाचा नाट्यप्रयोग सुमती थिएटर्स यांची ‘चाट मसाला’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे. ३ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या नाट्य स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत.दररोज सायंकाळी ७ वाजता नाट्यप्रयोगास प्रारंभ होणार आहे. दि. १८ रोजी श्रीरंग प्रस्तुत ‘दि कॉन्शन्स’, १९ रोजी श्रीदेवी जुगाई कलामंच, कोसुंब यांचे ‘पुन्हा एकदा वसंत’ हे नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. दि. २० रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांचे ‘ती खिडकी’, दि. २० रोजी संकल्प कलामंच यांचे ‘देह देहाय देहस्य’, दि. २२ रोजी समर्थ रंगभूमी प्रस्तुत ‘तो एक अरुणास्त’ हे नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत. दि. २३ रोजी साईकला क्रीडा मंच पिंगुळी यांचे ‘याच दिवशी याचवेळी’, दि. २४ रोजी सहयोग संस्थेचे प्र. ल. मयेकर लिखित ‘तक्षकयाग’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. दि.२५ रोजी राधाकृष्ण कलामंचतर्फे ‘एका लग्नाचे स्वप्न’, दि. २६ रोजी महाकाली रंगविहार नाणीज यांचे ‘प्रश्न तुमच्या निर्णयाचा’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.दि. २७ रोजी क्षितीज संस्थेचे ‘एक चंद्रकोर’, दि. २८ रोजी भोईराजा युवा प्रतिष्ठान आगरनरळ यांचे ‘शब्दांगार’, दि. २९ रोजी बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाचे ‘मेन विदाऊट शॅडोज’, दि. ३० रोजी अक्षरसिंधू साहित्य कलामंच सिंधुदुर्ग यांचे ‘उलगुलान’, दि. १ डिसेंबर रोजी अजिंक्यतारा थिएटर्स गणेशगुळे यांचे ‘अम्मी’ हे नाटक सादर होणार आहे.दि. २ डिसेंबर रोजी अभिनव फाउंडेशन सावंतवाडी यांचे ‘अंधारयुग’ व दि. ३ रोजी आभार सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे ‘वात्रट मेले’ हे नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत. रत्नागिरीतील तमाम रसिकांना सलग १७ दिवस हे विविध नाट्यप्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. १७ नाट्यप्रयोगांमध्ये चार नाट्यप्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह््यातील असून, १३ नाट्यप्रयोग रत्नागिरी जिल्ह््यातील आहेत. रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह््यांसाठी ही प्राथमिक फेरी असताना रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अवघ्या चार संस्था प्राथमिक फेरीत सहभागी होत आहेत. या मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची जय्यत तयारी करण्यात आली आहे (प्रतिनिधी)आजचं नाटक‘चाट मसाला’लेखक - ओंकार राऊतदिग्दर्शक - ओंकार रसाळसुमती थिएटर्स, रत्नागिरी
नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आजपासून प्रारंभ
By admin | Published: November 16, 2015 10:31 PM