शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

जामसंडेत आजपासून राज्यस्तरीय कबड्डीचा थरार

By admin | Published: February 18, 2016 11:34 PM

नामांकित संघांचा सहभाग : उद्घाटनासाठी आरोही म्हात्रे, दिगंबर नाईक यांची उपस्थिती; तीन दिवस स्पर्धा

देवगड : जामसंडे येथे १९ फेब्रुवारी पासून कै. श्रीधर ऊर्फ आण्णा तावडे स्मृती चषक राज्यस्तरीय पुरूष व महिला खुलागट (निमंत्रित) कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामधून अनेक नामांकित संघ सहभागी झाले असून, या संघांमध्ये छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा सहभाग असणार आहे.या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सिनेकलाकार अभिनेत्री आरोही म्हात्रे, व अभिनेते दिगंबर नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, अजित गोगटे उपस्थित राहणार आहेत. जामसंडे विद्याविकास मंडळ संचलित कै. इंदिराबाई ठाकूर कला-क्रीडानगरी कबड्डी स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे.महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सिंंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन आणि देवगड तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडे आयोजित दि. १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.राज्यस्तरीय निमंत्रित पुरूष व महिला खुल्या गटासाठी विजेत्या संघाला २५ हजार रूपये व चषक, उपविजेत्या संघाला २० हजार रुपये व चषक, उपांत्य फेरीत पराभूत संघाला १० हजार रुपये व चषक, शिस्तबद्ध संघाला ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच अष्टपैलू खेळाडू रोख रूपये ३००१ व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट चढाई रोख रूपये २००१ व सन्मानचिन्ह, उत्कृष्ठ पकड रोख रुपये २००१ व सन्मानचिन्ह अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.तालुकास्तरीयस्तरीय निमंत्रित पुरूष व महिला खुल्या गटासाठी प्रथम क्रमांकाला७ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला ५ हजार व चषक, उपांत्य फेरीत पराभूत संघाला रोख २ हजार १ रूपये व चषक, शिस्तबद्ध संघाला १ हजार १ रुपये व सन्मानचिन्ह अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. अष्टपैलू खेळाडू ७०० रुपये व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट चढाई रोख रूपये ५०० व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट पकड ५०० रुपये व सन्मानचिन्ह अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)समारोपाला शिक्षणमंत्र्यांची उपस्थितीकबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या समारोपाला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, भाजप प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे दिली. या स्पर्धेतील रोमहर्षक लढती पाहण्यासाठी कबड्डीप्रेमी सज्ज झाले आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूरमधील संघया कबड्डी स्पर्धेत पुरूष १२ व महिला १३ असे २५ संघ सहभागी होणार असून, यामध्ये पुरूषांमध्ये जयभारत मुंबई शहर, शिवशक्ती मुंबई शहर, उत्कर्ष मुंबई उपनगर, सत्यम सेवा मंडळ, मुंबई उपनगर,शिवशक्ती पुणे, इस्लामपूर व्यायामशाळा सांगली, शाहू सडोली कोल्हापूर, छावा कोल्हापूर, कुणबी सेवा क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर, शिवम स्पोर्ट, देवगड सिंंधुदुर्ग, मावळा कोल्हापूर, सिंंधुदुर्ग, तर महिलांमध्ये मुंबई पोलीस जीमखाना, मुंबई शहर, शिवशक्ती, मुंबई उपनगर, सावित्रीबाई फुले मुंबई उपनगर, सत्यम सेवा मंडळ, मुंबई उपनगर, होतकरू ठाणे, अंकुर स्पोर्ट क्लब मुंबई शहर, शिंगणापूर कोल्हापूर, शिवाजी उदयन सातारा, अश्विनी स्पोर्ट, मुंबई उपनगर, देवरूख स्पोर्ट अ‍ॅकॅडमी, पोईसर जीमखाना, विशाल मुंबई, महाराष्ट्र पोलीस जीमखाना हे संघ सहभागी झाले आहेत.