तळेरे : कणकवली तालुक्यातील नांदगांव मुंबई-गोवा हायवेलगत असलेल्या श्रीराम ट्रेडर्सच्याजवळ असलेल्या इमारतीमधील काल मध्यरात्रीच्या दरम्यान येथे उभ्या असलेल्या ट्रकचे अज्ञात चोरट्याने टायर चोरून नेल्याने नांदगाव परिसरामध्ये वाहनधारकांमधून खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे .याबाबत ट्रक मालक महादेव पारकर यांनी कणकवली पोलीस स्थानकात अज्ञाताविरूध्द तक्रार दाखल केली आहे. महादेव पारकर यांचे दोन्ही ट्रक एकत्र असल्याने चोरटा गुपचूप टायर चोरून पलायन करण्यास यशस्वी ठरल्याचे दिसते.याबाबत वृत्त असे की, कणकवली तालुक्यातील नांदगांव मुंबई-गोवा हायवेलगत असलेल्या श्रीराम ट्रेडर्सच्याजवळ असलेल्या इमारतीमधील महादेव पारकर यांच्या मालकीचे दोन ट्रक आहेत. सायंकाळनंतर दोन्ही ट्रक इमारती शेजारी एकत्र होते.याच संधीचा फायदा घेत एका ट्रकच्या आडोशाने दुसऱ्या ट्रकचे क्र. एम.एच.०७/२०५५ याचे क्निनर साईडचे दोन्ही टायर व्हीलसहीत उतरविण्यात येऊन अज्ञानात चोरट्यांनी पलायन केले. चाकाऐवजी त्या ठिकाणी चिरा ठेवून दोन्ही व्हीलसहीत चाके उतरविण्यात आल्याचे दिसत आहे.यामुळे सदर मालकांचे जवळपास ४०,००० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या चोरीच्या घटनेमुळे नांदगांव परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकाराने वाहनधारकांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत कणकवली पोलीस स्थानकात ट्रक मालक महादेव पारकर यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.
नांदगाव येथे उभ्या असलेल्या ट्रकचे चोरले टायर, मालकाची पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 3:38 PM
कणकवली तालुक्यातील नांदगांव मुंबई-गोवा हायवेलगत असलेल्या श्रीराम ट्रेडर्सच्याजवळ असलेल्या इमारतीमधील काल मध्यरात्रीच्या दरम्यान येथे उभ्या असलेल्या ट्रकचे अज्ञात चोरट्याने टायर चोरून नेल्याने नांदगाव परिसरामध्ये वाहनधारकांमधून खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे .
ठळक मुद्देउभ्या असलेल्या ट्रकचे चोरले टायरनांदगाव येथे महामार्गावरील घटना : ट्रक मालकाची पोलिसांत तक्रार