शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

वायरीत ग्रामस्थांचा रास्ता रोको

By admin | Published: January 02, 2017 11:06 PM

मोहित झाड मारहाण प्रकरण : आचरेकरला जिल्ह्यातून हद्दपारची मागणी

मालवण : वायरी येथील मोहित मिलिंद झाड (वय १८) या महाविद्यालयीन युवकाला झालेल्या गंभीर मारहाणप्रकरणी सोमवारी दुसऱ्या दिवशीही वातावरण तंग होते. मोहित याच्यावर जीवघेणा हल्ला केलेल्या संशयित आरोपी सतीश आचरेकर याला अटक करून हद्दपार करा व आरोपीला पाठीशी घालणारे पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ यांना तत्काळ निलंबित करा, अशी संतप्त भूमिका वायरी ग्रामस्थांनी घेत देवबाग-मालवण रस्त्यावर रास्ता रोको केला. दीड तास चाललेल्या या आंदोलनात ग्रामस्थांनी पोलिसांविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. त्यामुळे वायरी परिसरात दुसऱ्या दिवशीही तणावपूर्ण वातावरण होते. दरम्यान, रास्ता रोको आंदोलनकर्त्यांची पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांनी घटनास्थळी भेट घेतली. यावेळी संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने आरोपीला अटक केली जाईल. तसेच वाघ यांची चौकशी करून कारवाईबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठविला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर दीड तासानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. मालवण बंदरजेटी येथे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘बदल्या’च्या प्रकारावरून झालेल्या भ्याड हल्ल्यात वायरीतील मोहित झाड याला गंभीर दुखापत झाली होती. जखमी मोहित याच्यावर गोवा येथे उपचार सुरू आहेत. याबाबत सतीश आचरेकर याने मारहाण केल्याप्रकरणी वायरी ग्रामस्थ आक्रमक बनले होते. आचरेकर याला हद्दपार करा, तसेच आरोपीला पाठीशी घातल्याने पोलिस अधिकारी वाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, या दोन मागण्यांसाठी वायरी ग्रामस्थांनी वायरी-भूतनाथ मंदिरात बैठक आयोजित केली होती. पोलिस निरीक्षकांवर प्रश्नांचा भडिमारबैठकीदरम्यान भूतनाथ मंदिर येथे आलेले पोलिस निरीक्षक अरविंद बोडके व सहायक पोलिस निरीक्षक विजय म्हसकर यांना ग्रामस्थांनी प्रश्न विचारत हैराण केले. ग्रामस्थांनी पोलिसांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत मारहाण प्रकरणातील आरोपी आचरेकर याच्याशी पोलिसांचे लागेबांधे असल्याचा गंभीर आरोप केला. पोलिसांकडून आरोपीला अभय मिळाल्याने मारहाणीचा प्रकार घडला. त्यामुळे आरोपी व पोलिस अधिकारी यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी पोलिस निरीक्षक बोडके यांनी आरोपीला अटक करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. आरोपीला अटक करण्याची आपली जबाबदारी आहे, तर डॉ. वाघ यांच्याबाबतही चौकशी करून कारवाई अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाईल, असे सांगितले. या बैठकीत सरपंच सुजाता मातोंडकर, शिवसेनेचे हरी खोबरेकर, काँग्रेसचे मंदार केणी, कमलाकर चव्हाण, संजय लुडबे, भगवान लुडबे, प्रसाद आडवनकर, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, अविनाश सामंत, लारा देसाई, महेश देसाई, संदेश चव्हाण, गौरव प्रभू, बबन चव्हाण, मंदार लुडबे, भालचंद्र केळुसकर, अन्वय प्रभू, प्रदीप मांजरेकर, बाबा मोरजकर, पोलिस पाटील पांडुरंग चव्हाण, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी) देवबाग-मालवण मार्गावर दीड तास वाहने रोखलीआक्रमक बनलेल्या ग्रामस्थांनी मोहित झाड याच्या घरासमोरील देवबाग-मालवण मार्गावर तब्बल दीड तास रस्ता रोखून धरला. ट्रॅव्हल्सचालक राजेंद्र चव्हाण यांनी उपनिरीक्षक वाघ यांनी आदल्या दिवशी तक्रार घेतली असती तर सतीश याला पुन्हा मारहाण करण्याची हिंमत झाली नसती, असे सांगितले. दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे देवबाग व मालवणच्या दिशेने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात पर्यटक तसेच अपना बाजारासाठी गेलेल्या महिला व नागरिक, शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. यावेळी रुग्ण घेऊन जाणाऱ्या एका रिक्षाला मार्ग करून देण्यात आला होता. अखेर पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांनी पोलिस उपनिरीक्षक डॉ. वाघ यांचा चौकशी अहवाल तत्काळ वरिष्ठांना पाठविण्यात येईल. तसेच मारहाण करणाऱ्या आचरेकर याला अटक करण्यासाठी पोलिस पथके तैनात केली असल्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.