शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

दोडामार्गला वादळाचा तडाखा

By admin | Published: May 12, 2017 10:50 PM

दोडामार्गला वादळाचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कदोडामार्ग / कणकवली : वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट करीत कोसळलेल्या अवकाळी पावसाने शुक्रवारी पुन्हा एकदा दोडामार्ग तालुक्याला चांगलाच तडाखा दिला. घोटगे-परमे पंचक्रोशीत हजारो केळींची झाडे जमीनदोस्त झाली, तर रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे पडून वाहतूक ठप्प झाली. झरेबांबर, साटेली भेडशी, वायंगणतड परिसरात घराच्या छपरावरील कौले व पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले. तर कणकवली तालुक्यातील पियाळी गावठण येथे सूर्यकांत कुडतरकर यांच्या शेतातील ऊस भरणी करीत असताना अचानक विज पडल्याने वाघेरी येथील प्रभाकांत मोहन वाघेरकर यांचा एक बैल जागीच ठार झाला, तर दूसरा बैल जखमी झाला असून, ते स्वत:ही जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. प्रभाकांत वाघेरकर यांच्यावर फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना कणकवली येथे अधिक उपचारासाठी आणण्यात आले . कणकवली शहरासह जिल्"ात ठिकठिकाणी ढगांच्या गडगडाटासह शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. वीज चमकण्याचे प्रमाणही जास्त होते. वैभववाडी, फोंडा, तळेरे, नांदगाव, कासार्डे परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यातील विविध भागात वादळाने झाडे कोसळली होती.कणकवली तालुक्यात शुक्रवारी विजेच्या कड़कडाटासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वाघेरी येथील प्रभाकांत वाघेरकर (३५) हे पियाळी गावठण येथे ऊस भरणीचे काम करीत होते. यावेळी अचानक पडलेल्या विजेमुळे त्यांचा एक बैल जागीच ठार झाला. तर दूसरा बैल जखमी झाला आहे. तसेच वाघेरकर हे सुध्दा जखमी झाले आहेत. या घटनेबाबत माहिती समजताच ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वाघेरकर यांना तत्काळ फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.घटनास्थळी मंडळ अधिकारी ममता तांबे यांनी भेट देवून पंचनामा केला.तसेच माजी उपसभापती संतोष कानडे, तुळशीदास रावराणे, बबन नारकर, दामोदर नारकर, महेंद्र राणे, पोलिसपाटील सुनील पवार यांनीही भेट देवून पहाणी केली. वाघेरकर यांची सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बैलजोडीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. या घटनेमुळे वाघेरी पंचक्रोशित हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच तहसीलदार गणेश महाडिक यांनी सायंकाळी फोंडाघाट येथे जावून वाघेरकर यांची विचारपुस केली. तसेच घटनेबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत परमेश्वर फड उपस्थित होते.